Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : अतिउच्च वाहिनीसाठी भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

Electricity Tower : बाभळेश्वर-कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनी आळे गावातून जात असून यासाठी शेतात टॉवर उभारण्यास येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

Team Agrowon

Pune News : बाभळेश्वर-कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनीच्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी विरोध केला असून, ही वाहिनी होऊ देणार नाही वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बाभळेश्वर-कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनी आळे गावातून जात असून यासाठी शेतात टॉवर उभारण्यास येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले असून गेल्या १० ते वर्षांपासून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात असून या प्रकरणी न्यायालयात शेतकरी दाद मागत आहेत.

जमिनींचे वेळोवेळी होणारे संपादनास शेतकरी कंटाळला असून पिंपळगाव जोगा पाटपाण्याचे कालवे, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे संपादन, पुणे-नाशिक द्रुतगर्ती महामार्ग, रस्ते महामार्ग रुंदीकरण यासाठी संपादन वेळोवेळी होत आहे. त्यात टॉवर लाइनचे भूसंपादन न परवडणारे आहे.

ही वाहिनी आळे येथील ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संजय कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन कुऱ्हाडे, जिजाबाई कुर्हाडे, गणेश कुऱ्हाडे, उत्तम भुजबळ, सुजित कुऱ्हाडे, नामदेव कोकणे, पोपट भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, गेणभाऊ हुलवळे, प्रकाश आदी २९ शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार असल्याने यासाठी भूसंपादनास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

तसेच संबंधित कंपनीने वाढीव मोबदला दिला तरी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी माहीती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, महापारेषणच्या इंजिनीअर्सने नव्याने सर्वेक्षण केलेल्या बागायती शेतीचे भूसंपादन न करता पहिला जो डोंगराळ भागातून सर्वे झालेला आहे, त्या सर्वेतूनच ४०० केव्ही अतिउच्च वाहक विद्युतवाहिनी करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

रेडिकनेटर दराच्या १० पट मोबदला जरी दिला तरी भूसंपादन होऊ देणार नाही. तसेच जुन्नर तालुक्यात असलेला जीएमआरटीमुळे कुठल्याही प्रकारे औद्योगिकीकरण होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तरी शेतीचे नुकसान करू नये व मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे तोपर्यंत महापारेषणने बळजबरीने काम करू नये, अन्यथा सर्व शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, असा कडक इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT