Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : अकोल्यातील शेतकऱ्यांना मिळाली १०५ कोटी ४० लाख रुपयांची भरपाई

Crop Insurance Compensation : अकोला जिल्हयात या हंगामात पावसाचा खंड निर्माण झाला होता. परिणामी सोयाबीन या पिकाला सर्वाधिक फटका बसला. या पिकाची महत्त्वाची अवस्था आॅगस्टमध्ये सुरु होती.

Team Agrowon

Akola News : जिल्हयात यावर्षी पावसाचा खंड पडल्याने आॅगस्टमध्ये खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली होती. या काळातील नुकसानाची भरपाई म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.

यानुसार पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख ८६ हजार ६०७ शेतकऱ्यांना आत्तापर्यंत सुमारे १०५ कोटी ४० लाख रुपये खात्यात जमा केले आहेत. तांत्रिक कारणांमुळे अद्याप २६ हजारांवर शेतकऱ्यांना ही भरपाई खात्यात जमा होऊ शकलेली नाही

अकोला जिल्हयात या हंगामात पावसाचा खंड निर्माण झाला होता. परिणामी सोयाबीन या पिकाला सर्वाधिक फटका बसला. या पिकाची महत्त्वाची अवस्था आॅगस्टमध्ये सुरु होती. कुठे हे पीक फुल धारणेत तर कुठे शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत होते. याच काळात पाऊस न झाल्याने उत्पादकतेवर परिणाम होईल हे गृहीत धरीत जिल्हा समितीने पीकविमा कंपनीला २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर कंपनीने या महिन्यात कारवाई करीत शेतकऱ्यांना ही अग्रिम भरपाई खात्यात जमा करणे सुरु केले. जिल्ह्यातील सात तालुक्यात ५२ महसूल मंडलातील एक लाख ८६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १०५ कोटी ४० लाख ७२ हजार २३९ रुपयांची भरपाई जमा करण्यात आलेली आहे.

२६३२६ शेतकरी प्रतीक्षेत

एकीकडे पावणे दोन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली असली तरी तांत्रिक अडथळ्यांमुळे जिल्ह्यातील २६ हजार ३२६ शेतकरी दूरच आहेत. या शेतकऱ्यांची प्रामुख्याने बँक खात्याशी निगडीत अडचणी आहेत.

काही शेतकऱ्यांच्या ईकेवायसी नसल्याने खात्याची माहिती जुळेनाशी झालेली आहे. याबाबत यंत्रणास्तरावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय कृषी खात्याची यंत्रणा सुद्धा ई-केवायसी करण्याबाबत मार्गदर्शन करू लागली आहे.

पावसाअभावी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता भरपाई म्हणून अग्रिम देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार १ लाख ८६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १०५ कोटी ४० लाखांवर रक्कम थेट खात्यात जमा झाली. राहलेल्या शेतकऱ्यांनाही ही भरपाई लवकर मिळण्याबाबत कार्यवाही केली जात आहे.
- शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT