Crop Insurance : आठ हजार कोटी गेले तरी कुठे?

Uddhav Thackeray on State Government : जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेलेत का, ८ हजार कोटी गेले कुठे , असा सवाल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Nagpur News : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेलात का, ८ हजार कोटी गेले कुठे , असा सवाल शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी (ता.११) उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजाला हजर राहिले. यावेळी त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत कळवा, असे विमा कंपन्या म्हणतात.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रचारात ; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

पण, ७२ तासानंतरही विमा कंपन्यांच्या फोन आणि दारे-खिडक्या बंद आहेत. पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत.

Uddhav Thackeray
Crop Insurance : 'राज्याच्या २४ जिल्ह्यात २२१६ कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर'

अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी करायला हवी.’’

धारावीच्या पुनर्वसनावर बोलताना ते म्हणाले,‘‘धारावीकरांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. मात्र, आम्ही संपूर्ण मुंबई अदानी-अंबानींच्या घशात घालू देणार नाही. तिथे टीडीआरची सक्ती करायला नको. तरीदेखील टीडीआर बँक बनवायची असेल तर त्याची मालकी सरकारकडे असायला हवी. अदानीकडे नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com