Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांचे शेतकरी पीककर्जापासून वंचित

Farmers deprived of crop loans : जळगाव जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांतर्फे अद्यापही पीककर्ज वितरण सुरू झालेले नाही. १२ हजारांवर शेतकरी पीककर्जापासून वंचित असून, या सभासद शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांतर्फे अद्यापही पीककर्ज वितरण सुरू झालेले नाही. १२ हजारांवर शेतकरी पीककर्जापासून वंचित असून, या सभासद शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

जिल्हा बँक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांतर्फे पीककर्जाचे वितरण करते. परंतु ज्या सोसायट्या अनिष्ट तफावतीत गेल्या आहेत. त्या सोसायट्यांतर्फे पीककर्ज वितरण करण्याचे अधिकार जिल्हा बँकेने काढून घेतले आहेत.

अशा सोसायट्यांच्या सभासदांना जिल्हा बँकेने थेट कर्ज वितरणाचा निर्णय घेतला आहे. परंतु या सोसायट्यांच्या सभासदांना अद्यापही पीककर्ज मिळालेले नाही. अमळनेर तालुक्यात सुमारे १४ सोसायट्या अनिष्ट तफावतीत आहेत. जिल्ह्यात ही संख्या ६८ पेक्षा अधिक आहे. संबंधित सोसायट्यांचे नियमीत कर्जदार शेतकरी मात्र पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या किंवा चांगली वसुली असलेल्या सोसायट्यांतर्फे कर्जाचे वितरण गतीने झाले आहे. या सोसायट्यांतील पीक कर्ज वाटप ८० टक्क्यांवर आहे. दुसरीकडे अनिष्ट तफावतीलील सभासद शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्‍न रेंगाळला आहे.

अर्जाची गरज

अनिष्ट तफावतीत असलेल्या सोसायटीच्या नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज हवे असल्यास त्याबाबतचा अर्ज संबंधित तालुक्याच्या उपविभागीय शाखा किंवा निर्देशित शाखेत द्यायचे आहेत. हे अर्ज पुढे जिल्हा शाखेत पाठविले जातील. तेथे पडताळणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पीककर्ज मिळते.

या प्रक्रियेला काही दिवस लागतात. तेथून मंजुरी आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास पीककर्ज उपविभागीय स्तरावरून किंवा मायक्रो एटीएमने दिले जाते. त्यात २५ हजार रुपये पीककर्जासाठी २० रुपये शुल्क लागते. या एटीएमच्या मदतीने एका वेळी ७५ हजार रुपये मिळतात. यात अनेक शेतकऱ्यांनी अर्जच सादर केलेले नाहीत. यामुळे संबंधित नियमीत कर्जदार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT