Drought Subsidy : शिंदखेड्यात दुष्काळी अनुदान कर्ज खात्यात परस्पर वर्ग

Drought Grant Loan Account : खरीप हंगाम-२०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यांतील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान दिले आहे.
Drought Subsidy
Drought SubsidyAgrowon

Chimthane News : खरीप हंगाम-२०२३ मध्ये राज्यातील ४० तालुक्यांतील दुष्काळी तालुक्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश होता. शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे ८६ कोटी मदतीपोटी शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी अनुदान दिले आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले दुष्काळी अनुदान संबंधित बँकांनी अथवा अन्य वसुलीपोटी कर्ज खात्यात जमा करू नये, असा शासनाचा आदेश असतानाही तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थेट कर्ज खात्यात जमा केल्याने शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Drought Subsidy
Drought Subsidy : दुष्काळी अनुदान परस्पर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात

शिंदखेडा तालुक्यात यंदा खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिके वाया गेल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२३ ला आदेश काढून दुष्काळ जाहीर केला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. जिरायत पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार ५०० रुपये व फळबागेसाठी २२ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘केवायसी’साठी हेलपाटे

दुष्काळी अनुदानसाठी मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘मदत आधार प्रमाणीकरण पावती’ म्हणजे केवायसी करणे शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रावर जाऊन बंधनकारक आहे. मदत व पुनर्वसन विभागाची साइट चालत नसल्याने ई-सेवा केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर हे अनुदान बॅंकेच्या खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी नाके नऊ आलेले आहे.

Drought Subsidy
Farmers Drought Subsidy : सर्व्हर सुरु नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्यात खोडा

खरीप २०२३ दुष्काळी अनुदान निधीवाटप

क्षेत्राचा प्रकार शेतकरी क्षेत्र (हेक्टर) निधी (लाख)

जिरायत ७९५४४ ९५५०४.६९ ८२०२.९०

बागायत ९२१ १६१८.०९ २७५.२१

फळबाग ७८९ ७५४.०९ १६९.६९

एकूण ८१२५४ ९८८७७.७७ ८६४७.८०

शिंदखेडा तालुक्यातील सर्व बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शासनाचे जे काय शेतकऱ्यांना व इतरांना आर्थिक मदत किंवा अनुदान दिले जाते ते कर्ज खात्यात जमा करता येणार नाही अशा सपष्ट सूचना दिल्या आहेत. काही बँकांच्या तक्रारी येत आहेत. तसे आढळल्यास संबंधित बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार, शिंदखेडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com