Subhash Salve Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming Mission : सेंद्रिय शेती विषयक विज्ञान शेतकऱ्यांनी शिकणे आवश्यक

Aatma Project Director Subhash Salve : सर्व प्रकारचे सेंद्रिय शेती विषयक ज्ञान आणि विज्ञान शेतकऱ्यांनी शिकणे आवश्यक, असल्याचे मत आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Beed News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पातळीवर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

प्रशिक्षणात सहभागी होऊन सर्व प्रकारचे सेंद्रिय शेती विषयक ज्ञान आणि विज्ञान शेतकऱ्यांनी शिकणे आवश्यक, असल्याचे मत आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गटप्रमुख व सदस्य शेतकरी यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्रात मंचावर आत्मा प्रकल्प संचालक श्री. साळवे बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिंगारे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, उद्यानविद्या शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी व मंडळ कृषी अधिकारी यशवंत दहिफळे यांची उपस्थिती होती.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले. पिकांच्या वाढीव उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा अतिरेक वापर करण्यात आला. सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला.

या सर्वांमुळे आपल्या शेत जमिनीचा कस हळूहळू कमी झालेला दिसून येतो आहे. जमिनीचे ढासळलेले आरोग्य, जमिनीची कमी झालेली उत्पादकता, या सर्वांचा परिणाम म्हणून शेतीमध्ये उत्पादन खर्च व नफा यांचे गुणोत्तराचे प्रमाण बदलले आहे. त्यासाठी जमिनीची जैविक सुपीकता वाढविणे आवश्यक, असल्याचे पंके यांनी सांगितले.

श्री. वडखेलकर म्हणाले, की रसायनमुक्त अन्नधान्य निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे. जमिनीचा पोत सुधारण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर असल्याचे ते म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमाला अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील २० गावातील ८० शेतकरी व ८ कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिके केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT