Nanded News: मुखेड तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन पुरामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगोली व हसनाळ या गावांत पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले. या आपत्तीत पाच नागरिकांसह लहान-मोठे ५२ जनावरे दगावले आहेत तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत..प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना निवारा, भोजन व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लातूर, उदगीर व कर्नाटकामधील अतिवृष्टी व बाऱ्हाळी मंडलांत झालेल्या ३६४ मिलिमीटर व मुक्रमाबाद मंडळात २०६ मिलिमीटर पाऊस झाला..Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल.यामुळे लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. पाणी शिरलेल्या रावणगावमधील २२५ नागरिकांना धोक्याच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना निवारा, अन्न व आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. हसनाळ येथे ७ ते ८ नागरिक पुरात अडकले होते, त्यांपैकी चार जणांचे मृतदेह मिळाले..Heavy Rain Nanded : नांदेड जिल्ह्यातील १७ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी.एका नागरिकाचा शोध सुरू आहे. भासवाडी येथील २० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भिंगोली येथील ४० नागरिक सुरक्षित स्थळी हलवले गेले आहेत. मुखेड उदगीर तालुक्याच्या सीमेजवळील धडकाळ येथे पुलावरून एक कार, एक ऑटोमधील चार पुरुष व तीन महिला वाहून गेले होते. त्यापैकी तीन पुरुषांना बचाव पथकाने वाचविले, तर तीन पुरुष एक महिला अद्याप बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे..५२ जनावरे दगावलीमुखेड तालुक्यात लहान-मोठे मिळून ५२ जनावरे दगावली असल्याची माहिती मिळाली. पशुवैद्यकीय विभागाद्वारे जखमी जनावरांना औषधोपचार केले जात आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, आरोग्य विभाग व स्थानिक यंत्रणा शोध व बचाव कार्यात गुंतल्या आहेत. .पीडितांना तातडीने निवारा, अन्न व वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बचाव कार्याची सतत पाहणी सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.