Business Planning Training : शालेय विद्यार्थांना व्यवसाय नियोजनाचे प्रशिक्षण

Agricultural Sector : शालेय विद्यार्थांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (फाली) अभ्यासक्रमातील व्यवसाय नियोजन सादरीकरण उपयुक्त ठरणार आहे.
Business Planning Training
Business Planning TrainingAgrowon

डॉ. धनंजय कच्छवे

India's Future Agriculture Sector : जगभरात शेतीशी संबंधित विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे. त्याचा प्रसार व वापर यामध्ये वाढ होत असली तरीही शेती उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सद्यःस्थितीत फार कमी प्रमाणात होत आहेत.

पुढील काळात शेतीक्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी शेती क्षेत्राकडे उद्योगक्षेत्र म्हणून पहावे लागेल. हे लक्षात घेऊन शालेय विद्यार्थांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (फाली) अभ्यासक्रमातील व्यवसाय नियोजन सादरीकरण उपयुक्त ठरणार आहे.

व्यवसाय नियोजन

‘फाली‘ अभ्यासक्रमामध्ये इयत्ता ८ वी आणि ९ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शेती क्षेत्राविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शेती व शेतीशी संबंधित व्यवसायांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपला आणि समाजाचा चरितार्थ चालवावा यासाठी शेती उद्योगाचा विचार करावा हा आहे. आणि या उद्योगाच्या पायाभरणी पासून ते विकासापर्यंतची माहिती देण्याचा प्रयत्न असतो.

Business Planning Training
Agriculture Business Training : महिलांना शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविणे आवश्यक

आवश्यक घटक

कुठलाही व्यवसाय उभा करायचा म्हणजे काही लोकांचा समूह अथवा गट असणे आवश्यक आहे. त्यानंतर नेमका कोणता व्यवसाय करायचा हे ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक भांडवल (वित्तपुरवठा), जमीन, उत्पादनासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी,

उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था, साठवणूक क्षमता, उत्पादक -विक्रेता- ग्राहक याची माहिती, विक्री किंमत, किमान फायदा याचा विचार करणे महत्त्वाचे असते. व्यवसायात असलेली स्पर्धा, जाहिरात, स्पर्धक व गुणवत्ता याचा विचार करणे आवश्यक असते.

सादरीकरण

व्यवसाय नियोजनासाठी आवश्यक घटकांची पूर्तता केली, की विद्यार्थी हा आपले व्यवसाय नियोजन सादरीकरण करत असतो. ‘फाली’ उपक्रमामध्ये व्यवसाय नियोजन सादरीकरणाकडे स्पर्धा म्हणून पहिले जाते. त्यामुळे सहभागी झालेला प्रत्येक गट हा आपले व्यवसाय नियोजन इतरांच्यापेक्षा कसे वेगळे आहे?

त्यात कशी नावीन्यता आहे? आणि तो कसा फायदेशीर आहे? हे सांगत असतो. कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा या तत्त्वांचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विचार करतात. उपस्थित मूल्यमापन करणारी व्यक्ती सादरीकरणात कोणाचा व्यवसाय नियोजन सर्वोत्तम आहे हे ठरवतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राची आवड कशी निर्माण केली जात आहे.

Business Planning Training
Agriculture Education : भाऊसाहेबांमुळे शिक्षण, कृषी क्षेत्रांत परिवर्तन

व्यवसाय नियोजन सादरीकरणामुळे विद्यार्थी हा शेती व शेती संबंधित उद्योगांची सर्व माहिती मिळवत आहेत. विविध नवनवीन उद्योगांच्या संकल्पना मांडत आहेत, त्यांचे नियोजन सादर करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राविषयीची आवड निर्माण झाली आहे.

व्यवसाय नियोजन सादरीकरणामुळे, स्पर्धेमुळे विद्यार्थी हे शेती क्षेत्र कसे फायदेशीर आहे हे विद्यार्थांना समजत आहे.या उपक्रमामुळे १४ ते १६ हा वयोगट असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयीची आवड निर्माण होण्यास मदत झाली आहे.

माध्यमिक शाळेतील विद्यार्थी हा शेती क्षेत्राकडे उद्योग, उद्योजकता, रोजगार वाढ, उत्पन्नाची हमी, बाजारपेठ, उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहकाचे समाधानातून स्वयंविकास या बाबींची जोखीम प्रत्यक्षात ‘फाली’च्या प्रात्यक्षिकातून तपासून पाहत आहेत.

इंधनाची बचत, हाच नफा

सिलिंडरच्या आधारे प्रति किलो खवा निर्मितीसाठी ५० रुपये, डिझेल आधारे ६० रुपये, विजेच्या आधारे ३० रुपये, लाकडाच्या आधारे २० रुपये तर सौरऊर्जेच्या आधारे जेमतेम १० रुपये खर्च होतो.

याचा अर्थ प्रति किलोमागे इंधनाची मोठी बचत होते. पर्यावरणाचा ऱ्हासही वाचतो हे जोगदंड यांच्या प्रकल्पाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकलस्प असावा असे जोगदंड यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com