Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी
Rain Update: मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत दमदार पावसाचा अनुभव आला. काही तालुक्यांत पिकांना दिलासा मिळाला तर बीडमधील पेंडगाव मंडलात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले.