Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न
Agriculture Innovation: घातखेड (जि. अमरावती) येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे विदर्भातील संत्री आणि कापूस या मुख्य पिकात आधुनिक तंत्रज्ञान आणतानाच अन्य फळपिकांचे पर्याय तपासले जात आहेत. जैविक निविष्ठा उत्पादन, माती परीक्षण प्रयोगशाळा यासोबतच विविध सुधारित पिकांच्या प्रात्यक्षिकातून प्रत्यक्ष तंत्रज्ञान प्रसारावर भर दिला जात आहे.