Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याकडे शेतकऱ्यांचा काणाडोळाच

Kharif Season 2025 : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामातील पिके विमा संरक्षित करण्याकडे शेतकऱ्यांनी काणाडोळाच केल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामातील पिके विमा संरक्षित करण्याकडे शेतकऱ्यांनी काणाडोळाच केल्याची स्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत केवळ १६.२५ टक्के, तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ १८.५६ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्याला पसंती दिली आहे.

आधीच्या एक रुपयात पीकविमा योजनेनंतर पीक विमासाठी बदललेल्या निकषामुळे पिकांना वीमा संरक्षण देणे शेतकरी इष्ट समजत नसल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेवर न पडणे अतिवृष्टीमुळे नुकसान होणे कीड व रोगामुळे नुकसान होणे काढणे पश्चात नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जायचे. त्यामध्ये विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद होती.

परंतु आता बदललेल्या पीकविमा धोरणामुळे या सर्व तरतुदींना कोलदांडा देत केवळ पीक कापणी प्रयोग आटोपल्यानंतर येणाऱ्या उत्पादकतेवरच विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल पिकांना विमा उतरवण्याकडे कमी असल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतून सुमारे ७१ हजार ८३५ शेतकऱ्यांनी सहा लाख १४ हजार ३१३ अर्जाद्वारे सुमारे २ लाख ८८ हजार ८४८.२९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. गतवर्षी या विभागात खरीप पीकविमा संरक्षित करण्यासाठी १३ लाख ८७ हजार ६२ शेतकऱ्यांनी ३७ लाख ८० हजार २२७ अर्जाद्वारे पुढाकार घेतला होता.

लातूर कृषी विभागात गतवर्षीच्या हंगामात १८ लाख ८८ हजार ३६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख ७३ हजार ८११ अर्जाद्वारे पिकांना विमा संरक्षण घेतले होते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५० हजार ९३८ शेतकऱ्यांनी ७ लाख ३७ हजार ५५७ अर्जांद्वारे सुमारे ४ लाख ८० हजार ९४२.०९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

Crop Insurance
Crop Insurance

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT