Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांनी बजावली केंद्र, राज्यासह विमा कंपनीला नोटीस

Insurance Compensation : पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना एक रुपयात दिला जातो. उर्वरित रक्‍कम शासनाकडून कंपन्यांच्या खात्यात टाकली जाते.

Team Agrowon

Chandrpur News : जिल्ह्यातील ८४ हजार ७४२ शेतकऱ्यांचे विमा भरपाईपोटी १३३ कोटी ९८ लाख ५६ हजार ३८६ रुपये मिळाले नाहीत. ही रक्‍कम १५ दिवसांच्या आत खात्यात जमा न झाल्यास या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यासंबंधीची कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाचा कृषी विभाग, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. दीपक चटप यांच्यामार्फत ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना एक रुपयात दिला जातो. उर्वरित रक्‍कम शासनाकडून कंपन्यांच्या खात्यात टाकली जाते. मात्र हा सारा पैसा जनतेचाच आहे. असे असले तरी नुकसानीनंतर विमा भरपाईस कंपन्यांकडून टाळाटाळ केली जाते, असा आरोप याचिकाकर्त्या शेतकऱ्यांचा आहे.

ओरिएंटल विमा कंपनीच्या जुलै-२०२४ रोजीच्या पत्रानुसार विमा कंपन्यांनी पात्र ठरविलेल्या जिल्ह्यातील ८७ हजार ७४२ शेतकऱ्यांचे १३३ कोटी ९८ लाख रुपये अद्यापही मिळालेले नाहीत. या शेतकऱ्यांनी विमा भरपाईकरिता रीतसर प्रक्रिया पूर्ण केली होती. विमा दावेही करण्यात आले. त्यानंतर भरपाई मिळालेली नाही.

कंपनीने पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांना देखील १५ दिवसांच्या आत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे. गजानन लोडे, किशोर डुकरे, शब्बीर सय्यद, नरेश सातपुते, सुनीता शेंबाळे, परमेश्‍वर वारे, अविनाश डोहे, सत्यशिला हरबडे, वामन ढेंगळे, प्रभाकर कारेकर या शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. दीपक चटप यांनी ही नोटीस बजावली आहे.

जनतेच्या पैशातूनच विमा हप्ता भरला जातो. असे असतानाही बाधित शेतकऱ्यांना भरपाईस कंपन्यांकडून टाळाटाळ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी आहे. त्याकरिता बाधित शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र, राज्य सरकारचा कृषी विभाग, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, चंद्रपूर जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
- दीपक चटप, अधिवक्‍ता, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT