Crop Insurance : बीडच्या शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपूर्वी पिक विमा वितरीत करा; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

Agriculture Minister Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात मंगळवारी कृषीमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली.
Dhananjay Munde
Dhananjay Mundeagrowon
Published on
Updated on

Pune News : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यातील रक्कमेच्या २५ टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून भारतीय कृषी विमा कंपनीने तब्बल २२ कोटी ३ लाख रूपये तटवले आहेत. यावरून मंगळवारी (ता.१३) कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रमुख अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी कृषीमंत्री मुंडे यांनी विमा कंपनीला कोणतेही कारण न देता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे ३१ ऑगस्टच्या आत वितरीत करावेत, असे निर्देश दिले आहेत. यावेळी कृषी संचालक विनयकुमार आवटे, उपसचिव पाटील, भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सावंत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बीडल जिल्ह्यातील २०२३-२४ या सालात खरीप व रब्बी हंगामात एकूण ४०० कोटी २४ लाख रूपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. जो आतापर्यंतचा आहे. तर मंजूर पीक विम्यापैकी आतापर्यंत ३७८ कोटी २१ लाख रूपयांचे वितरण झाले आहे. पण जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळीसह काही तालुक्यातील महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांचे २२ कोटी ३ लाख रूपयांचे वितरण कंपनीने केलेले नाही. तर याबाबत कोणतेही कारण ही दिलेले नाही.

Dhananjay Munde
Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील चार टक्के कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग

तर कंपनीने कोणतेही कारण न देता काही शेतकऱ्यांचे विमा अर्ज देखील नाकारले आहेत. त्यावरून मुंडे यांनी मंगळवारी बौठक घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज कोणतेही तांत्रिक कारण किंवा सबब न देता कंपनीने मंजूर करावेत. विमा कंपनीने तटवलेले उर्वरीत पैसे ३१ ऑगस्ट पूर्वी वितरित करावेत निर्देश दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५३ कोटी रूपये

दरम्यान मुंडे यांनी गेल्या आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार शेकऱ्यांना पीक विम्यापोटी ८५३ कोटी रूपये मंजूर झाल्याची माहिती दिली होती. तर मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना ३१ ऑगस्ट पूर्वी पिक विम्याची रक्कम मिळेल असा, दावा मुंडे यांनी केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com