Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा परताव्यासाठी वेंगुर्ल्यातील शेतकऱ्यांचे उपोषण

Farmer Hunger Strike : फळपीक विमा परताव्यासाठी वेंगुर्ले येथील आंबा, काजू बागायतदारांनी मंगळवारपासून (ता. ७) कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

Team Agrowon

Sindhudurg News : फळपीक विमा परताव्यासाठी वेंगुर्ले येथील आंबा, काजू बागायतदारांनी मंगळवारपासून (ता. ७) कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

परंतु चार दिवसांत परतावा मिळाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी बागायतदारांनी दिला.पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत देय रक्कम अद्याप आंबा, काजू बागायतदारांना मिळालेली नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंगळवारपासून वेंगुर्ला तालुक्यातील बागायतदारांनी कृषी कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले होते.

चर्चेसाठी माजी आमदार राजन तेली आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक एम. के. गावडे हे आले होते. त्यांनी भरपाईसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT