Farmers Protest : उपोषण सुरू होताच पाणी सोडण्याचा निर्णय

Agriculture Irrigation : जेऊरवाडी (ता. करमाळा) येथील शेतकऱ्यांना दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या चालू आवर्तनातून जेऊरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते.
Strike Farmer
Strike FarmerAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जेऊरवाडी (ता. करमाळा) येथील शेतकऱ्यांना दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या चालू आवर्तनातून जेऊरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. दहिगावच्या पाण्यासाठी जेऊरवाडीचे शेतकरी उपोषणाला बसताच अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

दहिगांव उपसा सिंचन योजनेचा कॅनॉल जेऊरवाडी परिसरातून जातो. मात्र या कॅनॉलमधून जेऊरवाडीतील शेतकऱ्यांना राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक पाणी घेऊ दिले जात नसल्याने या शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.

Strike Farmer
Gram Panchayat Elections : कोणत्या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता; पहा निवडणुक निकालाची लाईव्ह अपडेट

उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी भेट घेऊन गावातील नाल्याच्या लगत असणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी मागणीनुसार प्रत्येकी १ दिवस असे एकूण ३ दिवसांच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Strike Farmer
Asian Citrus Congress : एशियन सिट्रस काँग्रेसमध्ये ‘पंदेकृवि’चा दबदबा

या वेळी जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे, हनुमंत निमगिरे, दीपक निमगिरे, नामदेव निमगिरे, गणेश शिरसकर, गोरख निमगिरे, अनिरुद्ध वाघमोडे, सागर वाघमोडे, विजय निमगिरे यांच्यासह लाभक्षेत्रातील बहुतेक शेतकरी दिवसभर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

पाटबंधारे कार्यालयाचे अधिकारी राजकीय दबावामुळे जेऊरवाडीला मुद्दाम पाणी सोडत नाहीत. एक महिन्यापासून अधिकाऱ्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळेच आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.

कुकडी डावा कालवा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अमरसिंह आवटे यांनी उपोषण स्थळे भेट देऊन शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली मात्र पाणी सुटेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिले व शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com