Rain Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Heavy Rain Issue : शिरूर तालुक्यातील काही परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे, पॉलिहाउस व फळझाडांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्यातील काही परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे, पॉलिहाउस व फळझाडांचे नुकसान झाले आहे. टाकळी भीमा, घोलपवाडी, पारोडी, दहिवडी, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, खंडाळे, पिंपरी दुमाला आदी परिसरांत वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

खंडाळे येथील प्रगतिशील शेतकरी सुनील हिंगे यांच्या शेतातील पॉलिहाउस प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. पॉलिहाउसमधील पिकांची विमा कंपनीच्या निरीक्षकाने पाहणी केली असून, सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

पिंपरी दुमाला येथील रवींद्र बडदे या शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, पपई, पेरू ही फळझाडे वादळी वाऱ्यामुळे व जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत.

कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT