Crop Damage : मराठवाड्यात आठ दिवसांत ८८ हजार हेक्टरला फटका

Heavy Rain Crop Loss : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने जवळपास ८८ हजार ९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यात २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने जवळपास ८८ हजार ९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

याआधी पावसाचा कहर मराठवाड्यातील विविध भागात बरसला. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा एकदा परतीच्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात भर घालण्याचे काम केले आहे. प्रशासनाच्या या प्राथमिक अहवालात शेती पिकाचे नुकसान झालेल्या गावांमध्ये ३०४ गावांचा समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage : पीक नुकसानीचे पंचनामे करा

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २०३, जालन्यातील ६, बीडमधील १२, लातूरमधील ४६ तर धाराशिवमधील ३७ गाव शिवारातील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय बाधित शेतकऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक ७४ हजार ५३७ शेतकऱ्यांचा समावेश असून जालन्यातील ९५, बीडमधील ६३१, लातूरमधील ३२ हजार ८६४ तर धाराशिवमधील ९४५२ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नुकसान झालेल्या ८८ हजार ९५ हेक्टरमध्ये ८४ हजार २८२ हेक्टरवरील जिरायती, ३८१३ हेक्टरवरील बागायत पिकांचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. बागायत पिकांचे सर्वाधिक ३८०० हेक्टरवरील नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३ हेक्टरवरील बागायत पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घरांची पडझड झालेल्या गावांची संख्या...

घरांची पडझड झालेल्या नुकसानीमध्ये मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ८९ गावांचा समावेश आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरमधील ९, जालना १०, परभणी ११ ,बीड २७, लातूर १९ तर धाराशिवमधील १३ बाधित गावांचा समावेश आहे. पडझड झालेल्या कच्च्या, पक्क्या घरांमध्ये पूर्णतः पडझड झालेल्या एका घरासह अंशतः पडझड झालेल्या आठ पक्क्या व ६९ कच्च्या घरांचा समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी ८१२ कोटींची मागणी

जिल्हानिहाय नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • छत्रपती संभाजीनगर ४८ हजार १२१

  • जालना ५१

  • बीड ४८७

  • लातूर २९ हजार ६३३

  • धाराशिव ९८०३

  • सात व्यक्ती दगावल्या, ११० जनावरांचाही मृत्यू

२२ ते ३० सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्ती जालन्यातील दोन, परभणीतील ३, बीडमधील २ मिळून ७ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला .तर छत्रपती संभाजीनगर, परभणी व लातूरमधील प्रत्येकी एक व्यक्ती या आपत्तीत जखमी झाला. याशिवाय ११० जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सात, जालना १९, परभणी १६, हिंगोली ३, नांदेड १२, बीड ३१, लातूर ११ तर धाराशिवमधील मृत्युमुखी पडलेल्या ११ लहान मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या जनावरांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com