Wildlife Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Wildlife Agriculture Crisis : वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अर्जुनवाडी, तळेवाडी, तारेवाडी, हडलगे, मासेवाडी, मांगनूर तर्फ नेसरीच्या डोंगराळ भागात गव्यांचे वास्तव्य आहे.

Team Agrowon

Kolhapur News : नेसरी विभागातील अर्जुनवाडी, तळेवाडी, तारेवाडी, हडलगे, हेब्बाळ-जळद्याल, लिंगनूर, वाघराळी, बिद्रेवाडी, मांगनूर तर्फ नेसरी येथील शेतकरी गवे, वानर, डुक्कर, हत्ती अन्य वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याने त्रस्त झाले आहेत.

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अर्जुनवाडी, तळेवाडी, तारेवाडी, हडलगे, मासेवाडी, मांगनूर तर्फ नेसरीच्या डोंगराळ भागात गव्यांचे वास्तव्य आहे. परिसरातील शेतीमधील हातातोंडाशी आलेल्या पिकांचे गव्यांच्या कळपांकडून नुकसान होत आहे.

भात, ऊस, पिके वन्य प्राण्यांकडून फस्त होत आहेत. या पिकांची नुकसान भरपाई देण्यासह बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अनेक शेतकऱ्यांकडून शेतीचे संरक्षण केले जात आहे. घटप्रभा नदीला मुबलक पाणीसाठा, तारेवाडी, हडलगे, डोंगर भागातील घनदाट झाडीत तर अर्जुनवाडी डोंगराळ भागात बांबूची लागवड केली आहे.

त्या भागात गव्यांचे कळप राजरोस वावरताना दिसतात. काही वेळा हत्तींकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतात बुजगावणे उभे करणे, कापड बांधणे, वाद्य, फटाके वाजवणे, वेगवेगळे आवाज काढून वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नुकसान टाळण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांची राखण करत आहेत. सध्या भात, भुईमूग, नाचणी पिकांकडे गव्यांच्या कळपांनी आपला मोर्चा वळवल्याने शेतकरी हवालदिल झालेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जखनी नावाच्या शेतात हत्तीने भात पिकांचे नुकसान केले आहे. गव्यांच्या कळपांकडूनही नुकसान नित्याचेच झाले आहे. शेताची राखण, कुंपण करूनही वन्य प्राण्यांवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. वन विभागाने याप्रश्नी कार्यवाही करावी.
- सागर आंबेकर, शेतकरी, तारेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT