Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : गाय दूध खरेदी दर कपातीच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन

Cow Milk Issue : दूध संघांनी गाईचे दूध खरेदी दर कमी केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२०) शेतकरी संघटना व कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येथे आंदोलन करण्यात आले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : दूध संघांनी गाईचे दूध खरेदी दर कमी केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२०) शेतकरी संघटना व कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येथे आंदोलन करण्यात आले. दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून या दर कपातीचा निषेध करण्यात आला.

गेली वर्षभर गायीच्या दूध दरात सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत.

दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान प्रति लिटर ४० रुपये दर द्यावा.

बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे. वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये करावे. यासह जिल्ह्यातील दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात केलेली कपात मागे घ्यावी यासाठी हे आंदोलन झाले.

शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना अध्यक्ष ज्योतिराम घोडके, सतीश चव्हाण, मच्छींद्र पाटील, शशिकांत यादव, अमर रजपूत, आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. मागणीनुसार निर्णय न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा या वेळी दूध उत्पादकांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT