Farmers Protest : मोठ्या आंदोलनासाठी सज्ज, लवकरच घोषणा करू : पंढेर

Sarvan Singh Pandher : किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले, की शेतकरी भविष्यात मोठे आंदोलन आयोजित करण्याची योजना आखत आहेत आणि त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल.
Sarvan Singh Pandher
Sarvan Singh PandherAgrowon
Published on
Updated on

Punjab News : संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १८) पंजाबमध्ये ‘रेले रोको’ आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध रेल्वे मार्गांवर शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन रेल्वे मार्ग रोखले.

दरम्यान, किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले, की शेतकरी भविष्यात मोठे आंदोलन आयोजित करण्याची योजना आखत आहेत आणि त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल.

Sarvan Singh Pandher
Farmers Rail Roko Protest : शेतकरी संघटनेतर्फे उद्या पंजाबमध्ये ‘रेले रोको’

अमृतसरमधील देवी दासपुरा येथील आंदोलनात सर्वन सिंग पंढेर यांनी भाग घेततला. ते म्हणाले, की अहवालांतील माहितीनुसार २०२२ मध्ये शेतकऱ्यांना एमएसपी न मिळाल्याने त्यांचे अंदाजे १५ लाख कोटी आणि २०२३ मध्ये ८.५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आम्ही भविष्यात मोठ्या आंदोलनासाठी तयार आहोत.

आज ना उद्या आम्ही त्याची घोषणा करू.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाचे (गैर-राजकीय) निमंत्रक जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले, की आंदोलक शेतकरी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीला भेटणार नाहीत.’ बुधवारी या समितीसमवेत शेतकऱ्यांची बैठक होणार होती, मात्र त्यांनी बैठक नाकारली.

Sarvan Singh Pandher
Delhi Farmers Protest : आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहावे ः राजू शेट्टी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान शनिवारी (ता. १४) विषारी द्रव्य प्राशन करून शंभू सीमेवर आत्महत्येचा प्रयत्न करणारे लुधियाना जिल्ह्यातील रतनहेरी गावातील शेतकरी रणजोध सिंग (वय ५७) बुधवारी (ता. १८) येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात मृत्यू झाला, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

२६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर बेमुदत उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती बिघडल्याने रणजोध सिंग यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. सिंह यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विविध मागण्यांच्या समर्थनार्थ शंभू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com