Expired Medicines Agrowon
ॲग्रो विशेष

Expired Medicines : वैधता संपलेली औषधं फवारल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; पती-पत्नीचं आमरण उपोषण

Buldhana news : राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा होत असल्याची कबुली राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. तसेच यावर चाप लावण्यासाठी प्रशासनास निर्देश दिले असून कोणाची गय केली जाणार नाही असेही त्यांनी म्हटले होते.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विविध भागात मॉन्सून सक्रीय झाला असून आता खरीप हंगामातील शेतीच्या कामांना गती आली आहे. यादरम्यान चढ्या दरासह बोगस बी-बियाणे आणि खतांचीही विक्री केली जात आहे. त्यावरून यात सत्यता असल्याची कबुली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. तर दोषींवर कारवाई निर्देश मुंडे यांनी दिले होते. यादरम्यान बुलढाण्यात वैधता संपलेले औषध कृषी केंद्र चालकाने दिल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यावरून शेतकरी दाम्पत्याने गेल्या चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तसेच कृषी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिह्यातील मेहकर तालुक्यातील थार गावात दादाराव वानखेडे हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मेहनत करून दोन एकर शेतात फुलकोबीची लागवड केली होती. त्याच फुलकोबीची माती कृषी केंद्र चालकाच्या नफेखोरीने केली आहे. त्याने दिलेल्या फवारणी औषधामुळे शेतकऱ्याचे ७ लाखांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दादाराव वानखेडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हाधिकारी कर्यालयसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून याकडे अद्याप प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.

दरम्यान भाजीपाला उत्पादक शेतकरी वानखेडे यांच्या तक्रारी आणि उपोषणानंतर कृषी विभागाने पंचनामा केला असून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार दिवस होत असून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकरी वानखेडे यांनी म्हटले आहे.

आम्ही आमच्या दोन एकरात फुलकोबीची लागवड केली होती. त्यानंतर फुलकोबीवर फवारणी केली होती. पण त्या फवारणीनंतर शेतातील संपूर्ण फुलकोबी खराब झाला आहे. फवारणीसाठी कृषी केंद्र चालकाने वैधता संपलेले औषध दिल्याने आमच्यावर हे संकट कोसळले आहे. तर आमचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळवी.
- भाजीपाला उत्पादक शेतकरी वानखेडे

बुलढाणा जिह्यातील मेहकर तालुक्यातील थार येथील दादाराव वानखेडे यांनी त्यांच्या शेतात फुलकोबीची लागवड केली होती. मात्र त्यावर फवारणी करतेवेळी दुकानदार यांनी त्यांनी वैधता संपलेले औषधी दिल्याने फुलकोबी खराब झाली. परिणामी त्यांचे जवळपास ७ लाखांचे नुकसान झाले. यासंदर्भात कृषी विभागाने सुद्धां पंचनामा केला असून वरिष्ठाकडे अहवाल सादर केला. मात्र त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दर दबावातच; शेवगा दर तेजीतच, भेंडीला चांगला उठाव, मोसंबी आवक टिकून तर सोयाबीनचे दर दबावातच

GST Rate Cut : जीएसटी सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी येतील, सर्वसामान्यांच्या हातात अधिक पैसे राहतील- निर्मला सीतारामन

Agriculture Success Story: वारकेंची तंत्रशुद्ध, बहुविध पीकपद्धती

Beed Ahilyanagar Railway: ४० वर्षांची प्रतीक्षा संपली; बीड–अहिल्यानगर रेल्वे अखेर सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

Monsoon Rain: मराठवाड्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT