Buldhana DCC Bank : जिल्हा बॅंकेकडून होत असलेली मालमत्ता जप्तीची कारवाई थांबवा ; स्वाभिमानीची मागणी

Farmer Loan : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले त्यांना थकीत असल्याचे कारण दाखवून मालमत्ता लिलाव करण्याचा घाट बँकेमार्फत घातला जात आहे.
Buldhana DCC Bank
Buldhana DCC BankAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल आहे. असे असताना चिखली तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले त्यांना थकीत असल्याचे कारण दाखवून मालमत्ता लिलाव करण्याचा घाट बँकेमार्फत घातला जात आहे. ही जप्तीची कारवाई थांबवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विनायक सरनाईक यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

Buldhana DCC Bank
Chara Chhavani : थकित बिलांचा निर्णय कधी लागणार?

ज्या माजी संचालक खातेदारांनी कोट्यवधींचे कर्ज घेतले आणि ते बुडवले आहे, अशांकडून प्राधान्याने कर्जाची वसुली करा. त्यांना कर्जापोटी दिलेला पैसा हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा आहे. तो आधी वसूल करा आणि मगच शेतकऱ्यांच्या दारात जा असेही त्यांनी म्हटले आहे. सक्तीची वसुली व मालमत्ता जप्तीची कारवाई थांबविण्याचे आदेश २४ ऑगस्ट रोजी दिलेले असून, त्या आदेशांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, सहकारी सोसायट्याकडून कर्ज घेतलेल्या परंतु दोन्ही कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत शेतकरी कमी पावसामुळे हवालदिल झालेला आहे. मागील वर्षीच्या नुकसानाची रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तर या वर्षी पेरलेले पीकसुद्धा धोक्यात आले आहे. असे असताना चिखली तालुक्यात थकित शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जात आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांसह मागील आठवड्यात कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्याचप्रमाणे चिखली येथे सद्धा या कारवाईच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सक्तीच्या वसुलीबाबतची कारवाई तीन महिने स्थगित करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींसमक्ष दिले होते. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com