Groundwater Report: भूजलपातळी वाढली, रब्बीला मिळणार आधार
Groundwater Level Rise: यंदा झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. ३५४ तालुक्यांतील ३७०३ नमुना विहिरींपैकी ३०३४ विहिरींत (सुमारे ८२ टक्के नमुन्यात) ० ते ३ मीटरच्या वर पाणीपातळीत वाढ नोंदली गेली आहे.