Buldhana News : अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू, बुलडाण्यात धक्कादायक प्रकार

Bees : मधमाशांच्या १२५ पेट्यांमधील अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Honeybees
Honeybeesagrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या गावामध्ये राहणाऱ्या पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्यावर वेगळचं संकट आले आहे. मागच्या तीन वर्षांपासून तो मधमाशी पालनाचा व्यवसाय करतो. दरम्यान त्याने केलेल्या शेतात घुसून काही अज्ञातांनी मधमाश्या मारल्याची घटना समोर आली आहे.

मधमाशांच्या १२५ पेट्यांमधील अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याच्या आर्थीक संकटाबरोबर पर्यावरणाचीही मोठी हाणी झाले आहे.

मागच्या तीन वर्षांपासून मगर हा व्यवसाय करतात त्यांना वर्षाला जवळपास २ टन मध मिळायचा. यातून ते वर्षाला साधारण दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवायचे. परंतु अचानक काही लोकांनी किटक नाशके टाकून माशांना मारल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पांडुरंग मगर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

मगर यांनी मागच्या तीन वर्षात उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश व बिहार येथून मधमाशांचे बीज या ठिकाणाहून आणलं होतं यामध्ये शेतात जवळपास १२५ पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या होत्या. त्यांची संख्या जवळपास अडीच कोटी एवढी होती.

Honeybees
Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई

या पेट्यांमधील मधमाशा जवळपास परिसरातील तीन किलोमीटर अंतरावरून फुलांमधील मध गोळा करून आणत असत. त्यामुळे दरवर्षी मगर यांना या व्यवसायातून दोन टनापर्यंत मध मिळायचे. यातून त्यांना मोठा नफा मिळायचा.

याप्रकरणी पांडुरंग मगर म्हणाले, मी खादीग्राम एनबीबीचा अधिकृत सदस्य आहे. आम्ही आमचा मध चेतक फार्म्स या नावाने विदेशात पाठवण्याच्या तयारीत आहे. मधविक्रीसाठी आवश्यक सर्व लायसन्स आम्ही काढले आहेत.

तसेच मधमाशा पालनासाठी ज्या नोंदणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या आहेत. प्रशासनाने याची चौकशी करून आम्हाला शक्य तेवढी मदत करावी. तसेच ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी मगर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com