Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : शेतकऱ्यांची वहिवाट यंदाही निघणार चिखलातूनच

Panand Road Scheme : पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक पाणंद रस्ते दलदलीचे स्वरूप घेतात. शेतकऱ्यांची वहिवाट बंद होऊन त्यांना शेतमालाची ने-आण करता येत नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.

Team Agrowon

Washim News : पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक पाणंद रस्ते दलदलीचे स्वरूप घेतात. शेतकऱ्यांची वहिवाट बंद होऊन त्यांना शेतमालाची ने-आण करता येत नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. अशा विपरीत परिस्थितीत पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण होणे नितांत गरजेचे आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेंतर्गत १५५ रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला असला तरी या रस्त्यांचे काम पुढे गेलेले नसल्याने यंदाही चिखलातूनच वाट काढावी लागेल काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य पाणंद रस्ते नाहीत. अनेक शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतशिवार गाठावे लागते. राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात २६५ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यातील २०८ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. तर १५५ रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले.

त्यातील ४१ रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली असली तरी, एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चिखल आणि खाचखळगे तुडवत शेतात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपकरातून (सेस फंड) गतवर्षी नव्यानेच अंमलात आणलेल्या उन्नती-शेत पाणंद रस्ते योजनेतून जिल्ह्यात ७९ कामे पुर्णत्वाकडे जात आहेत.

जिल्ह्यात मागील वर्षी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत २०८ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रत्यक्षात यातील ४१ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत, परंतु जॉबकार्डधारक मजूर कामावर येत नसल्याने कामे रखडल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

तालुकानिहाय मंजूर रस्ते

वाशीम १०६

मालेगाव ३१

रिसोड ६९

मंगरुळपीर २५

कारंजा २८

मानोरा ६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT