Farm Road : शेत रस्त्यांच्या तक्रारी महिनाअखेर निकाली काढा

Meghana Bordikar : एका वर्षात ही ९३ गावे आदर्श गाव करण्याचे आपले‌‌ उद्दिष्ट आहे. याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घ्यावा.
Meghana Bordikar
Meghana BordikarAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जनता दरबारात सर्वात जास्त शेत रस्त्यांबाबतचे तक्रार अर्ज येत असून महिन्याअखेर शेत रस्त्यांच्या तक्रारी निकाली काढाव्यात, अशा सूचना पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केली.

जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रार अर्ज व पालकमंत्री टास्क फोर्स प्रगती यांचा आढावा शुक्रवारी (ता. ११)जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात घेतला. यावेळी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.

Meghana Bordikar
Farm Road : अपुऱ्या निधीमुळे शेतरस्ते निर्मिती संथ

साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना ‘एक गाव दत्तक’ या उपक्रमाच्या माध्यमातून ९३ अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही ९३ गावे आदर्श गाव करण्याचे आपले‌‌ उद्दिष्ट आहे. याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घ्यावा.

Meghana Bordikar
Farm Road : पाणंद रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा

यावेळी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. गावडे म्हणाले, की पालकमंत्री जनता दरबारामध्ये प्राप्त ८८७ अर्जांपैकी ४२१ अर्ज निकाली काढण्यात आले असून उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू आहे. जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही.जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावेत, अशी सूचना पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना केली.

अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उद्घाटन...

आर्य पंप्स कंपनीने तयार करून दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहन जिल्ह्यात परभणी शहर महानगरपालिका, नगरपरिषद गंगाखेड, सेलू आणि जिंतूर यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ४ वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनाचे पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com