Farm Road Issue : चंदगडमध्ये शिवाराला जोडणारे ६५ रस्ते होणार खुले

Revenue Department : शेतशिवाराला जोडणारे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी चंदगड येथील महसूल विभागाने १०० दिवसांचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
Farm Road
Farm RoadAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शेतशिवाराला जोडणारे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी चंदगड येथील महसूल विभागाने १०० दिवसांचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ५३३ रस्त्यांपैकी ६५ रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. ते खुले करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

आत्तापर्यंत सुमारे २५ रस्ते खुले केले आहेत. ११ एप्रिलपर्यंत उर्वरित रस्ते खुले केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. पूर्वी केवळ खरिपाचा हंगाम घेतला जात असल्याने पीक कापणीनंतर शेतशिवारात जाण्यासाठी कोणाची आडकाठी नव्हती. शासनाने पूर्वीपासून शिवारांसाठी पाणंद रस्ते, शिव रस्ते, शिवार रस्ते, गाडीवाट या नावाने रस्ते ठेवले होते.

Farm Road
Farm Road : शेकडो शेतकऱ्यांची पाणंद वाट मोकळी

मात्र बहुतांश ठिकाणी त्यावर अतिक्रमण झाले आहे. अलीकडे कुटुंबाचे विभाजन झाल्यामुळे शेतजमिनीच्या वाटण्या झाल्या आहेत. प्रकल्पांमुळे बारमाही पाण्याची उपलब्धता झाल्याने पीक पद्धती बदलली आहे.

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एका शेतातून दुसऱ्या शेतात जाताना मोठ्या अडचणी आहेत. उसाची तोडणी केल्यानंतर वाहतुकीचाही प्रश्न आहे. यासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित असल्याने शासनाने खास उपक्रम राबवला आहे.

Farm Road
Farm Road : अपुऱ्या निधीमुळे शेतरस्ते निर्मिती संथ

तालुक्यात ६ फेब्रुवारीला सुरु झालेल्या या अभियानांतर्गत नकाशे उपलब्ध करणे, स्थळ पाहणी करुन वहिवाट रस्ते शोधणे, गाव पातळीवर समिती स्थापन करणे आदी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे समुपदेशनाचे काम पूर्ण करुन प्रत्यक्ष रस्ते खुले केले जात आहेत.

रस्त्यात अडथळा आणला असल्यास मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ५ नुसार आणि बांधावरून रस्त्याची मागणी केली असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार तडजोड घडवून रस्ता देण्याचे काम सुरु आहे. हे प्रयत्न असफल ठरल्यास भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या मदतीने रस्त्याची मोजणी करुन पोलिस बंदोबस्तात तो खुला केला जाणार आहे.

शेतातील रस्त्यांबाबत प्रत्येक गावातून तक्रारी आहेत. शासनाच्या या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे अनेक गावातील रस्ते खुले होतील. त्यातून शेताकडे केली जाणारी शेतीपूरक साहित्य, बियाणे, खतांची वाहतूक सोपी होईल.
- राजश्री पचंडी, मंडल अधिकारी, हेरे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com