Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Land Survey : शेतजमीन मोजणीसाठी अतिरिक्‍त शुल्‍काचा भुर्दंड

Land Survey Additional Fee : निवडणुकांमुळे शेतमोजणीसह अन्य सरकारी कामांना विलंब होत आहे. त्‍यामुळे शेतकरी त्रस्‍त असून आता नव्या नियमांमुळे नाहक मनस्‍ताप सहन करावा लागत आहे.

Team Agrowon

Pali News : पाली ः निवडणुकांमुळे शेतमोजणीसह अन्य सरकारी कामांना विलंब होत आहे. त्‍यामुळे शेतकरी त्रस्‍त असून आता नव्या नियमांमुळे नाहक मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. मोजणीचा ऑनलाइन अर्ज भरताना सरकारने साधी, तातडीची, अति तातडीची मोजणी असे तीन प्रकार नमूद केले आहेत.

यात साध्या मोजणीसाठी अर्ज केल्‍यास किती कालावधी लागेल याबाबत अनिश्‍चितता असल्‍याने नाहक अतिरिक्‍त शुल्‍क भरून मोजणी करावी लागत आहे. जमाबंदी आयुक्तांकडून शेतजमीन अथवा जागेच्या मोजणीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून एक संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.

या ठिकाणी मोजणी अर्ज भरायचा आहे. कामात पारदर्शकता यावी, कामात सुसूत्रता यावी म्‍हणून ऑनलाइन मोजणी प्रक्रिया सोयीची वाटत असली तरी ही योजना शेतकऱ्यांसाठी तापदायक आणि खर्चिक ठरत आहे. ऑनलाइन मोजणी संकेतस्थळाला आता कर्मचारीही कंटाळले आहेत.

काही वेळा संकेतस्थळ बंद असते अथवा संथ गतीने सुरू असते. त्‍यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामारे जावे लागते. संकेतस्थळावर मोजणी अर्ज भरतानाची प्रक्रिया क्‍लिष्‍ट आहे. त्‍यामुळे सामान्य नागरिक वा शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात.

अर्ज भरताना सरकारने साधी, तातडीची, अति तातडीची असे तीन प्रकार केल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना नाहक जास्तीचे शुल्‍क भरावे लागते. हे शुल्‍क एकरी साधारण १२ हजारांपर्यंत येते. पूर्वी साधी आणि तातडीचे असे दोनच प्रकार होते. जे अर्जदार अति तातडीचे शुल्क भरतात, त्यांना लगेचच मोजणी तारीख मिळते, परंतु साधी मोजणीत चार महिन्यांनंतर मोजणीची तारीख मिळत असल्याने असंतोष पसरत आहे.

सध्या ऑनलाइन पद्धतीने मोजणी अर्ज भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. पूर्वी तीन हजार रुपयांत होणाऱ्या मोजणीसाठी आता बारा हजार रुपये शुल्क मोजावे लागत आहे. सामान्य शेतकरी कोठून आणणार इतके पैसे. याबाबत लवकरात लवकर सुधारणा अपेक्षित आहे.

- ॲड. नोएल चिंचोलकर, पाली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT