Panchaganga River agrowon
ॲग्रो विशेष

Panchaganga River : पंचगंगेची गटारगंगा झाल्यावर प्रशासनाला जाग, शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

Panchaganga River Pollution : पंचगंगेच्या प्रदूषित पाण्याने कॅन्सरसारख्या आजाराशी जिल्ह्यातील नागरिकांना सामना करावा लागत आहे.

sandeep Shirguppe

Panchaganga River Pollution Kolhapur : पंचगंगा नदीची गटार गंगा झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाहणी करण्याची जाग आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांना पंचगंगा प्रदूषण विरोधी आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्याने कॅन्सरसारख्या आजाराशी जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला सामना करावा लागत आहे. शेती नापीक होत आहे. आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रशासन कारवाई करणार आहे का नाही, असा सवाल मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांच्यासह मासेमारी करणाऱ्या भुई बागडी समाजबांधव व शेतकऱ्यांनी केला. प्रदूषित घटकांवर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, असा पवित्रा घेत घेराओ घातला.

दरम्यान, इचलकरंजी महापालिकेचा फिल्टर हाउसचे चेंबर फुटल्याने १८ एम. एल. डी. प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळले आहे. त्यांना कारवाईची नोटीस देणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी फोनवरून आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते शांत झाले आणि हरबट यांना घेराओमुक्त करण्यात आले.

तेरवाड (ता. शिरोळ) बंधारा येथे पंचगंगा नदीला प्रदूषित  पाणी  आल्याने पात्र फेसाळले आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्याबाबत आज सायंकाळी पाचच्या सुमारास पाण्याचे नमुने घेण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी हरबट आले असता बाबर यांनी त्यांना पाण्यामुळे होत असलेले दुष्परिणाम सांगत संताप व्यक्त केला.

प्रोसेस व काही शहरातील सांडपाणी  प्रक्रियेविना नदीत सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी  वाहत आल्याने नदीत मिसळलेले सांडपाणी  थेट वाहत तेरवाड बंधाऱ्यापर्यंत आले आहे. अनेक गावच्या पाणी योजना, शेती पंप या नदीवर आधारित आहेत, तर समाज बांधवांचीही मासेमारी यावरच अवलंबून आहे.

रासायनिक पाण्याने मासे, तर मृत्युमुखी पडतच आहेत. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता याबाबत तत्काळ उपाययोजना राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी क्षेत्रीय अधिकारी हरबट यांनी पाण्याचे नमुने घेतले. याबाबत आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडून योग्य ती उपाययोजना राबवू, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुकुंद सावगावे, रोहित माने, इरफान बेपारी, सचिन भोसले, प्रभाकर बंडगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

Yeola Rain Damage: येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दाणादाण

Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Illegal Tree Cutting: सातारा- लोणंद मार्गावर बेकायदा वृक्षतोड अन् वाहतूक

SCROLL FOR NEXT