Ring Road Protest : रिंग रोड भूसंपादन वाद पेटला: शेतकऱ्यांचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा, प्रशासनाला दिले निवेदन

Farmers March : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) बाधित १७ गावांतील शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १९) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. येत्या सोमवारपर्यंत (ता. २३) संयुक्त बैठक घेऊन मागण्यांवर लेखी निर्णय द्यावा, अन्यथा मंगळवारपासून (ता. २४) मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
demands of ring road project affected farmers today
latest news on ring road farmers agitation maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...