Crop MSP : रब्बीच्या पिकांचे आज ठरणार हमीभाव

Agriculture Value Commission : यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांचा हमीभाव ठरविण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाची मंगळवारी (ता. ११) सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होत आहे.
MSP
MSPAgrowon

Mumbai News : यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांचा हमीभाव ठरविण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाची मंगळवारी (ता. ११) सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होत आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे विजय शर्मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असल्याच माहिती, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावाची शिफारस करण्यासाठी दरवर्षी केंद्रीय कृषिमूल्य आयोग बैठक घेतो. मागील वर्षी काही पिकांच्या हमीभावात वाढ केली होती. राज्यातील गहू, हरभरा आणि अन्य कडधान्यांच्या हमीभावासाठी ही बैठक महत्त्वाची असून मागील वर्षी गहू, हरभरा, मसूर, मोहरी, सूर्यफुलाचे सुधारित दर जाहीर केले होते. त्यात किती वाढ होते हे उद्याच्या बैठकीत कळेल.

MSP
Agriculture MSP : कायदेशीर ‘एमएसपी’ही ठरेल नुकसानकारकच

या बैठकीला कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे सचिव अनुपम मिश्रा, केंद्रीय कृषी सचिव परिमल सिंग, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि राज्याच्या कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड उपस्थित राहणार आहेत.

MSP
Soybean MSP : सोयाबीनच्या हमीभावात पाच, तुरीत दहा टक्के वाढ शक्य

सध्या देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनच राज्यांत कृषिमूल्य आयोग असून अन्य राज्यांमध्ये हमीभाव निश्चितीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. आज (ता. ११) होणाऱ्या बैठकीसाठी देशातील केवळ पाच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या पंजाब आणि अन्य राज्यांचे प्रतिनिधी या बैठकीपासून लांब आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्याचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

रब्बीच्या पिकांच्या हमीभावाच्या शिफारशीसाठी ही बैठक होत आहे. पाच राज्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार असून सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com