Shivani Ramnath Fadol and Her Family Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Success Story: शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश

Nashik Inspiration Story: सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी, घरात कोणीही शासकीय नोकरीत नाही; मात्र कठोर परिश्रम घेऊन मखमलाबाद (ता. जि. नाशिक) येथील शेतकरी कन्या शिवानी रामनाथ फडोळ हिने न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी, घरात कोणीही शासकीय नोकरीत नाही; मात्र कठोर परिश्रम घेऊन मखमलाबाद (ता. जि. नाशिक) येथील शेतकरी कन्या शिवानी रामनाथ फडोळ हिने न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी’ परीक्षेत तिने राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. शेतकरी कुटुंबातील लेकीच्या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.

शिवानीचे प्राथमिक शिक्षण गंगापूर येथे झाले. पुढे मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. तर ‘केटीएचएम’ महाविद्यालयात विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ‘मविप्र’संस्थेच्याच विधी महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर संदीप विद्यापीठात ‘गुन्हेगारी कायदे’ विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सलग दोन वर्षे अभ्यासावर तिने लक्ष केंद्रित केले होते.

‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी’ पदासाठी जाहिरात निघाल्यानंतर ऑगस्ट-२०२३ मध्ये पूर्वपरीक्षा तर ऑगस्ट-२०२४ मध्ये मुख्य परीक्षा दिली. यात कठीण टप्पे पार करत १७ मार्च २०२५ रोजी मुलाखतीपर्यंत पोहोचली. यात चुणूक दाखवत गुणवत्ता यादीत ४ था क्रमांक मिळविला.

आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव, स्वप्नांचा ध्यास

शिवानीचा परिवार एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतो. वडील रामनाथ शेती करतात तर आई गृहिणी आहे. चुलते सोमनाथ व गोकुळ शेतकरी आहेत. आजवर कुटुंबात कुणीही शासकीय नोकरीत नव्हते. या प्रवासात विधी व न्याय विभागाचे उपसचिव असलेले तिचे मामा विलास खांडबहाले, ॲड. गणेश शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव, स्वप्नांचा ध्यास आणि काहीतरी करून दाखवण्याची बांधलेली खूणगाठ यामुळेच हे शक्य झाले. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख यांनी तिचा सन्मान केला.

निरंतर कठोर परिश्रम घेण्याची तयारी व ध्येय समोर ठेवल्यास यश मिळवणे अवघड नाही. माझ्या यशामध्ये कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आहेच. तसेच मार्गदर्शक, शिक्षक, मित्र-मैत्रिणींची देखील मोलाची साथ लाभली. संघर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी.
शिवानी पडोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT