Akola News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा ठेवली जात आहे. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीला आदेश देत बाधित शेतकऱ्यांना लाभ देण्याचे पत्र काढले.
मात्र, महिला लोटला तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसल्याने सोमवारी (ता.१०) शेतकरी पुत्र गोपाल पोहरे व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय आदेशाची होळी करून निषेध केला.
याबाबत पोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात चार लाख ३३ हजार ६६८ शेतकऱ्यांनी तीन लाख ५८ हजार ९९६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे दोन लाख ९८ हजार १९२ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अशा नुकसान बाधित शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, कंपनी प्रशासनाला जुमानत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून विमा मंजूर करून घेतला. पण सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ करताना कंपनी दिसत आहे.
३० जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत त्यांनी अधिसूचना काढत कंपनीला एक महिन्याच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा करण्याचा आदेश काढला होता. मात्र, सदर कंपनीने या अधिसूचनेला केराची टोपली दाखविल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या.
त्यामुळे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणारे शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदेशाची होळी करून आंदोलन केले. यावेळी देवानंद साबळे, संदीप मेटांगे, पंकज बाजोड, कुशल जैन, देवा गावंडे, श्री. कोगदे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.