Crop Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Harvesting : कापणीसाठी शेतकरी सज्ज

Paddy Harvesting : खरिपातील हळवे भात पीक तयार झाले असून, भातकापणीच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : खरिपातील हळवे भात पीक तयार झाले असून, भातकापणीच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. ग्रामीण भागात अजूनही शेतकरी विळ्यांच्या साह्याने भात कापणी करतात. यामुळे लोहार काम करणाऱ्या कारागिरांना चांगले दिवस आले आहेत.

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी जुने विळे - कोयते लोहार काम करणाऱ्यांच्या दुकानात आणून देत असून त्याला पुन्हा धार लावून घेत आहेत. या कामासाठी अनेक गाव खेड्यातून शेतकरी वर्ग लोहाराच्यादुकानात सकाळपासून गर्दी करीत आहेत.

सध्या नवीन विळा घ्यायचा झाल्यास १२० ते १३० रुपये लागतात, तर फक्त जुन्या विळ्याला पुन्हा धार लावून घ्यायची असल्यास ७० ते ८० रुपये द्यावे लागतात. यंदा पाच ते दहा रुपयांनी भाव वाढल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

सध्या पारंपारिक लोहार काम करणारे कमी झाल्याने ठराविक ठिकाणीच ही कामे केली जातात. कासाच्या रोटी, घंजाळ. वरोती परिसरात असलेल्या लोहारांच्या दुकानात गर्दी होत आहे.

हार्डवेअरच्या दुकानातही अनेक विळे विकायला ठेवले असून त्याला मागणी कमी आहे. ते स्वस्त असून नाजूक असल्याने त्याने नीट कापणीचे काम होत नसल्याचे अनेक मजुरांचे म्हणणे आहे.

त्यामुळे अजूनही पारंपारिक लोखंडी विळ्यांचा वापर शेतकरी वर्ग करीत आहे.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने भात कापणीसाठी शेतकरी झाला आहे. तसेच कापणीसाठी लागणारी अवजारे तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे.

हळवे भात पीक तयार झाली असून भात कापणीला सुरुवात करायची आहे. विळ्यांना धार लावायला सकाळपासून आलो आहोत. बारा ते चौदा विळ्यांना धार लावून घेण्यासाठी चार ते पाच तास लागणार आहेत. हजार ते बाराशे रुपये यासाठी खर्च होणार आहे. त्यात सध्या मजुरीचे भाव देखील वाढलेले आहे.
- रमेश भोये, शेतकरी
सध्या लोखंडाचे भाव सुद्धा वाढले आहेत, त्यात लोहार कामासाठी लागणारा कोळसा हा सुद्धा दुर्मिळ झाला आहे. यामुळे थोडा भाव वाढलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला जास्त काम नव्हते, आता शेतकरी वर्ग भात कापणीला लागणार असल्याने हाताला काम आले आहे. यामुळे थोडा आर्थिक फायदा होणार आहे.
- रोहन चव्हाण, लोहार कारागीर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT