Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कपाशीचा दोन वेचणीतच झाला खराटा

Cotton Crop : कापसाला मागील दोन वर्षांपासून भावच नाही. त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

Team Agrowon

Jalna News : कापसाला मागील दोन वर्षांपासून भावच नाही. त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा जागवित कपाशीची लागवड केली होती. त्यामध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले.

त्यानंतर दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे. दरम्यान, अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकापाठोपाठ एक संकट ओढवले आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, रोगराई, बेमोसमी पाऊस यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी वेळेत मजूर न मिळाल्याने अनेकांच्या कापसाची वेचणी न केल्याने नासाडी झाली आहे. वेचणी केल्यानंतर एक ते दोन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.

कापूस वेचणीसाठी गावात महिला शेतमजूर मिळत नसल्याने शहरातून व इतर ठिकाणाहून वाहनातून मजूर कापूस वेचणीसाठी आणण्याची वेळ आली आहे.

वाहन भाडे, कापूस वेचणीची मजुरी यात मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. कापसाच्या भाववाढीची दीर्घ प्रतीक्षा आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती भ्रमनिराशा होत चालली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT