Irrigation Department : एका गावात पाटबंधारे विभागाचा एक मध्यम प्रकल्प होता. गावातील सुमारे चारशे एकर जमीन या प्रकल्पात बुडाली होती. धरणातील पाण्याचा उपयोग खालच्या दोन-तीन गावांना होत असे. धरणामध्ये तीस-चाळीस शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी बुडाल्या होत्या.
गावात वीस-पंचवीस शेतकरी असे होते, ज्यांची थोडी जमीन पाण्याखाली गेली होती व थोडी जमीन पाण्याच्या वर राहिली होती. त्यापैकी एकनाथ नावाचा शेतकरी कष्ट करून त्याची धरणात न बुडालेली राहिलेली जमीन कसत होता.
धरणाची पाण्याची पातळी कमी झाली, की आणखी काही गाळपेर जमीन दरवर्षी उघडी पडत असे. सात महिने पाण्याखाली राहिलेली व उन्हाळ्यात चार-पाच महिने उघडी पडणारी ही गाळपेर जमीन अतिशय सुपीक होती. अशी जमीन उघडी पडली की एकनाथ या जमिनीमध्ये कधी कलिंगड तर कधी मका यांसारखी पिके घेत होता.
सुरुवातीची काही वर्षे एकनाथ हा फक्त स्वत:च्या मालकीच्या गाळपेर जमिनीत पीक घेत होता. कायद्याने सरकारने बुडालेल्या सर्व जमिनींचा कायदेशीर मोबदला संबंधित शेतकऱ्यांना दिला होता. त्यामुळे सरकार जमिनीचे मालक झाले होते.
हळूहळू काही वर्षे उलटल्यानंतर एकनाथ स्वत:च्या मालकीबरोबरच इतरांच्या पूर्वी मालकीच्या असलेल्या गाळपेर जमिनीवरती पिके घेऊ लागला. जमीन सरकारच्या मालकीची असल्यामुळे गावातले लोक काही बोलू शकत नव्हते व ज्यांच्या मालकीची जमीन होती ते पुनर्वसन झाल्यामुळे दुसऱ्या गावात निघून गेले होते.
गावातील काही लोकांनी स्थलांतरित झालेल्या या लोकांना कागाळी करून तुमची जमीन सरकारच्या मालकीची होऊन सुद्धा एकनाथ कसत आहे अशी तक्रार केली.
आता एकनाथ विरुद्ध इतर मूळचे जमीन मालक असा जमिनीचा नवाच खटला सुरू झाला आणि विशेष म्हणजे ज्या जमिनीमुळे भांडण सुरू झाले ती जमीन यापैकी कोणाच्याच मालकीची नव्हती, तर सरकारच्या मालकीची होती.
सरकारच्या मालकीच्या जमिनीबद्दल शेतकरी भांडत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटत होते.
ई-मेल - shekharsatbara@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.