रवींद्र पालकरLemon Orchard Care: लिंबूवर्गीय फळपिकांवर सिट्रस कॅंकर या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या रोगास देवी रोग या नावाने ओळखले जाते. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते झाडाच्या प्रौढ अवस्थेपर्यंत सर्व टप्प्यांवर दिसून येतो. हा रोग इतर लिंबूवर्गीय फळपिकांच्या तुलनेत लिंबू पिकावर अधिक आढळतो. .लक्षणे प्रामुख्याने पाने, फांद्या आणि फळांवर दिसून येतात. प्रादुर्भाव वाढल्यास पाने सुकून गळतात. फळांवर उठावदार, खडबडीत डाग तयार होतात, त्यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे कठीण असते. त्यामुळे रोगाची ओळख करून घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देणे आवश्यक आहे.रोगकारक जिवाणू : झॅन्थोमोनास अॅक्सोनोपोडिस पॅथोव्हर सिट्राय (Xanthomonas axonopodis pv. Citri).Citrus Crop Disease: लिंबूवर्गीय पिकांवरील ‘लीफ मायनर’.अनुकूल स्थितीपावसाळ्यातील उष्ण, दमट, ढगाळ आणि आर्द्रतायुक्त हवामान अत्यंत अनुकूल असते. नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात दिल्यास ती अधिक कोवळी पाने आणि नवीन फांद्या निर्माण करतात. त्यामुळे रोगाचा प्रसार जलद गतीने होतो..संसर्ग कसा होतो?झाडांवरील जुन्या जखमा, संक्रमित पाने आणि फांद्या हे रोगाचा मुख्य स्रोत आहेत. अशा जखमांमधून पावसाळ्यात जिवाणू बाहेर पडतात आणि पाण्याच्या थेंबांद्वारे आजूबाजूच्या भागात पसरतात. जिवाणू पानांवरील रंध्रांमधून (stomata) किंवा जखमांमधून झाडामध्ये प्रवेश करतात. पाने कोवळी असताना ती सर्वाधिक संवेदनशील असतात. अशा पानांच्या आत जाऊन जिवाणू पेशींमधील जागेत वाढतो, त्यामुळे पानांवर फोडांसारखे उठावदार चट्टे तयार होतात. या ठिकाणी पिवळसर वर्तुळाकार डाग दिसतात. जखमेतून स्रवणाऱ्या चिकट पदार्थामुळे जिवाणू दीर्घकाळ टिकून राहतो आणि कोरडेपणापासून स्वतःचा बचाव करतो..रोगाचा प्रसारपावसाच्या सरींनी आणि पाण्याच्या थेंबांमुळे हा जिवाणू एका पानावरून दुसऱ्या पानावर सहज पसरतो. जोरदार वाऱ्यामुळे पानांवर लहान जखमा होतात. त्या जखमांमधून जिवाणू पानांमध्ये प्रवेश करतो.सिट्रस लीफ मायनर (शास्त्रीय नाव ः फायलोक्निस्टिस सिट्रेला) या किडीच्या अळीने पानांवर केलेल्या खाण्यासाठी केलेल्या वाटांमधूनही संक्रमण होते.रोपवाटिकेमध्ये हा रोग सिंचनाच्या पाण्याने आणि संक्रमित रोपांच्या संपर्काने लगेच पसरतो.संक्रमित रोपे, फांद्या किंवा फळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे किंवा मानवी हालचालींमुळे या रोगाचा प्रसार नवीन ठिकाणी होतो..Lemon Farming : लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय, रासायनिक खते द्या.रोग नियंत्रणलागवडीसाठी सशक्त आणि रोगमुक्त रोपांची निवड करावी. जुन्या बागेतील रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. रोगग्रस्त फांद्या आणि पाने जाळून नष्ट करावीत.नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.पिकास आवश्यकतेनुसार सिंचन द्यावे.लीफ मायनर किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा..रासायनिक नियंत्रणनवीन फूट येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने स्ट्रेप्टोमायसीन* (५० ते १०० पी.पी.एम.) ०.५ ते १.० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फवारणीवेळी सर्व पाने आणि लहान फळे पूर्णपणे झाकली जातील, याची काळजी घ्यावी.कॉपर सल्फेट (४७.१५ टक्के) अधिक मॅन्कोझेब (३० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) ५ ग्रॅम किंवाकॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.(जिवाणूनाशके व बुरशीनाशकांना लेबल क्लेम आहेत)(टीप : संबंधित लेखाच्या तांत्रिक माहितीसाठी वनस्पती रोगशास्त्रज्ञांचा आधार घेण्यात आला आहे.).रोगाची लक्षणेपाने, फांद्या आणि फळांवर तपकिरी, खडबडीत उठावदार डाग दिसतात. सुरुवातीला पानांवर लहान, गोल, पाण्याच्या थेंबांसारखे पारदर्शक ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके पिवळसर-तपकिरी होऊन उंचावतात. सुरुवातीला हे डाग पानाच्या खाली आणि नंतर दोन्ही बाजूंना दिसतात. प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर डागांचा रंग पांढरट किंवा करडा होऊन मध्यभागी फुटून खरखरीत दिसू लागतो..या डागांच्या कडा हिरवट-पिवळ्या ते तपकिरी असतात आणि भोवती पिवळे वलय दिसते. हे डाग हळूहळू मोठे (१ मि.मी. ते १ सें.मी.) होऊन एकमेकांत मिसळून लांबट जखमा तयार करतात. पानाच्या देठावर किंवा शिरांवर डाग आल्यास पाने अकाली गळतात.फांद्यांवर हे डाग अनियमित, अधिक उठावदार व खडबडीत असतात, ज्यामुळे फांद्या तुटतात.फळांवरील डाग पानांसारखे दिसतात पण त्याभोवती पिवळे वलय नसते. डागांच्या मध्यभागी खळग्यासारखी खोलगट जखम दिसते. ही जखम फक्त सालेपुरती मर्यादित असते.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.