Shekhar Gaikwad : वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा किती वाटा?

Jamian Vata : एक दिवस तर ज्ञानदेवचा मोठा मुलगा माधव व त्याच्या पत्नीने वडलांच्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून गावाला जाऊन आई-वडिलांना शिवीगाळ केली व स्वतःच्या आई-वडिलांवर हात सुद्धा उगारला होता.
Land Shear
Land ShearAgrowon
Published on
Updated on

Land Shear Update : एका गावात ज्ञानदेव नावाचा एक माणूस राहात होता. ज्ञानदेव आठ वर्षाचा असतानाच त्यांच्या वडलांचे निधन झाले होते. ज्ञानदेवच्या घरात त्यांची आई होती. ज्ञानदेव जसजसा मोठा झाला तेव्हा त्याने कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. ज्ञानदेव रॉकेलची चिमणी लावून अभ्यास करत असतानाच्या काळात सुद्धा लोकांच्या कपड्यांची इस्त्री करत होता.

ज्ञानदेवने त्या काळी कष्ट करून शिक्षण घेतले व कृषी खात्यात त्याला सरकारी नोकरी मिळाली. ज्ञानदेवचे लग्न झाले तेव्हा ज्ञानेश्वर एका पडक्या घरात भाड्याने राहात होता. त्या घराचे भाडे तेव्हा अडीच रुपये इतके होते व पगार १०० रुपये इतका होता.

ज्ञानदेवच्या कुटुंबात त्यांची पत्नी व चार मुले होती. मोठ्या मुलाचे नाव माधव, मुलीचे नाव माधवी, मधला मुलगा कुणाल व सर्वात लहान मुलगा संदीप.

ज्ञानदेवचा मुलगा मोठा झाल्यावर त्याला सरकारी नोकरी लागली. मुलगी ही अतिशय शिकलेली होती. मुलीने चांगले शिक्षण घेऊन नोकरी केली, पण काही दिवसांनंतर तिने नोकरी सोडून स्वतःची एक कॉम्प्युटर संस्था टाकली. मधला मुलगा कुणाल हार्डवेअरचा व्यवसाय करतो.

तर लहान मुलगा संदीप हा सरकारी नोकरीत चांगल्या पदावर आहे. ज्ञानदेव सन २००४ मध्ये सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले. ज्ञानदेवने नोकरीच्या भरवशावर थोडे-थोडे पैसे साठवून थोडी फार जमीन खरेदी करून ठेवली. स्वतःचे घर बांधले.

अजून काही जमीन घेऊन ठेवली. या सर्व कठीण काळामध्ये ज्ञानदेवला साथ दिली ती त्यांच्या पत्नीने. ज्ञानदेवच्या पत्नीने मुलगा माधव याचे लग्न झाल्यानंतर तो अवघ्या तीन महिन्यांत घरापासून वेगळा राहू लागला. मधला मुलगा कुणाल याचे लग्न झाल्यानंतर तो सुद्धा परिवारापासून वेगळा राहू लागला.

Land Shear
Shekhar Gaikwad : नवीन शर्तीची जमीन कशी खरेदी करावी?

लहान मुलगा संदीप याला नोकरी लागल्यामुळे तो परिवारापासूनफार लांब राहत होता. मुलगी माधवी हीच आई वडिलांजवळ राहत होती. माधवीने लग्न केले नव्हते त्यामुळे ती आपलीसंगणक संस्था सांभाळून आई-वडिलांचा सांभाळ करीत आहे. ज्ञानदेवला पेन्शन पण मिळत आहे.

माधव व कुणाल हे दोघेही मुले व त्यांच्या बायका या आई-वडिलांची साधी विचारपूसपण करत नाहीत. लहान मुलगा संदीप हा नोकरीसाठी बाहेर असला, तरी अधून मधून आपल्या आई-वडिलांची व बहिणीची विचारपूसकरायला त्याची पत्नी व तो गावी घरी जात असतो.

हा सगळा प्रपंच उभा केला तो ज्ञानदेवने स्वतःच्या मेहनतीवर. मोठा मुलगा माधव हा सरकारी नोकरीत असताना तो व त्याची पत्नी हे आई-वडिलांना हिस्से वाटणीकरिता सारखा त्रास देत होते. त्यात मधला मुलगा कुणाल व त्याची पत्नी सुद्धा मोठा मुलगा माधव व त्याच्या पत्नीसोबत वडलांच्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून सहभागी होते.

एक दिवस तर ज्ञानदेवचा मोठा मुलगा माधव व त्याच्या पत्नीने वडलांच्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून गावाला जाऊन आई-वडिलांना शिवीगाळ केली व स्वतःच्या आई-वडिलांवर हात सुद्धा उगारला होता. वडील ज्ञानदेव यांना ते सहन झाले नाही व त्यांनी तत्काळ मुलगा माधव व त्याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

ज्ञानदेव व त्यांची पत्नी हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे पोलिसांनी त्यांची तक्रार लगेच नोंदवून घेतली व मुलगा माधव यांच्या घरी पोलीस गेले असता पोलिसांनी त्यांना सांगितले, की तुमच्या विरोधात तुमच्या वडिलांनी पोलिस केस केलेली आहे. तुम्ही जर परत त्यांच्या घरी गेलात, तर आम्हाला तुम्हा दोघांना अटक करावी लागेल.

त्यानंतर त्या दोघांना कोर्टाचे समन्स पाठविण्यात आले. कोर्टात वकिलांसमोर वडील ज्ञानदेवने सांगितले, की मी जिवंत असेपर्यंत कोणालाच वाटा देणार नव्हतो. पण मी जी ही सगळी संपत्ती कष्ट करून मिळवली आहे ती माझ्या मुलांसाठीच केली होती.

Land Shear
Shekhar Gaikwad : अधिकाऱ्यांकडून समान न्यायाची अपेक्षा

पण मुलांच्या या अशा वागणुकीमुळे मला आता कोणालाची या घराचा आणि संपत्तीचा वाटा द्यावयाचा नाही. ही संपत्ती माझी स्वतःची आहे आणि ती वडिलोपार्जित नसल्यामुळे त्या संपत्तीचा वाटा करण्याचा मला अधिकार आहे आणि तो कशाप्रकारे करायचा आणि कोणाला काय द्यायचे हे मी ठरवीन.

माझी मुलगी माधवी ही आमच्या दोघांचा सांभाळ करते, त्यामुळे मला वाटले तर मी त्या संपत्तीचा काही भाग मी तिला देईल व उर्वरित मी एखाद्या संस्थेला दान करील. पण मी मुलांना कोणताच वाटा देणार नाही.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे वडिलोपार्जित नसलेल्या वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नाही. जर ती संपत्ती वडिलोपार्जित असेल, तर ती मुलांना देता येते आणि मुले जर आई-वडिलांना त्रास देत असतील, तर त्यांना कुठलाही संपत्तीचा हिस्सा न देता त्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com