NDA Victory: भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांच्या आघाडीने दोनशे जागांचा टप्पा पार करीत बिहारच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसची दयनीय अवस्था झाली असून, ‘एनडीए’चे मनोधैर्य या निकालाने वाढणार, यात शंका नाही.