Fraud  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Fraud : ‘नाफेड’चा अधिकारी असल्याचे सांगून शेतकऱ्याला सहा लाखांचा गंडा

Farmer Issue : नाफेडचा अधिकारी असल्याचे सांगून पिंपळगाव बसवंत येथील एका शेतकऱ्याला ५ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाफेडचा अधिकारी असल्याचे सांगून पिंपळगाव बसवंत येथील एका शेतकऱ्याला ५ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की ‘नाफेड’चा अधिकारी असल्याचे सांगून संजय शिंदे यांनी नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठविण्यासाठी विश्वास माधवराव मोरे (रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत) यांच्याशी करार केला होता.

त्यांच्या सोळा कांदा साठवणूक गोदामासाठी ८ लाख ८० हजार रुपये असे भाडे ठरले. प्रत्यक्षात मात्र तीनच गोदामे भाड्याने घेतली. त्यामुळे उर्वरित तेरा गोदामे महिनाभरापासून रिकामी राहिली.

याबाबत विश्वास मोरे यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संजय शिंदे यांच्याकडून ५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संजय शिंदे व त्यांच्या साथीदारांनी ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’च्या मदतीने केंद्राने दिलेल्या निधीचा अपहार केल्याचे मोरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

संजय शिंदे हा नाफेडमध्ये अधिकारी नसल्याची बाब या वेळी तपासामध्ये उघडकीस आली आहे. याबाबत घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT