Sunflower Farming agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Farming : दुष्काळात सूर्यफुलाचा आधार, माळरानावर घेतलं सूर्यफुलाचे विक्रमी उत्पादन

Bogus Seeds Kolhapur : बोगस बियाण्यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे जिल्ह्यातील सूर्यफूल पिकाला मोठा फटका बसला.

sandeep Shirguppe

Kolhapur Sunflower Farmer : कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यफूल पीक अचानक गायब झाले आहे. बोगस बियाण्यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे जिल्ह्यातील सूर्यफूल पिकाला मोठा फटका बसला. मागच्या काही वर्षात सूर्यफूल पेरणीनंतर उगवण झाली परंतु काढणीच्या वेळेस दाणे न भरले नाहीत अशी परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून सूर्यफूल पिकाकडे पाठ फिरवली होती.

परंतु, उंदरवाडी (ता. कागल) येथील आनंदा शामराव पाटील यांनी मात्र कठोर परिश्रमाच्या जोरावर माळरानावर सूर्यफुलाचे जोरदार पीक घेतले आहे.या पिकाला सध्या फुले आली असून, सर्वच फुले एक ते सव्वा फूट व्यासाची आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पादन मिळण्याची आशा आहे. स्वतः पदवीधर असलेले आनंदा पाटील प्रयोगशील शेतकरी असून, त्यांच्या उसाला दरवर्षी प्रतिगुंठा दीड टन असा उतारा मिळतो.

यंदा त्यांनी पिराचा माळ नावाच्या शेतात १५ गुंठे क्षेत्रात ऊस लागवड केली. यात आंतरपीक म्हणून प्रामुख्याने सूर्यफूल, तर भुईमूग, मोहरी, तीळ, पोकळा, कोबी आदींसह अन्य पिकेही घेतली आहेत. लागणीपूर्वी पाटील यांनी शेतात सात दिवस बकऱ्यांचा तळ बसविल्याने जमिनीला भरपूर प्रमाणात लेंडी खत मिळाले.

ऊस लागणीवेळीच आनंदा पाटील यांनी अजिता कंपनीच्या सूर्यफूल बियाणाची पेरणी केली. त्यानंतर त्याला सेंद्रीय खत म्हणून शाश्वत खताची मात्रा दिली. आता ६० दिवसांनंतर या पिकाला फुले आली असून, ती जवळपास सुपाच्या आकाराची आहेत.

सूर्यफूल काढणीला अद्याप तीस ते चाळीस दिवसांचा अवधी असून, यंदा भरघोस उत्पादन होण्याचा त्यांचा अंदाज आहे. याकामी त्यांना पत्नी कविता, मुलगा अनिकेत यांची मदत झाली, तर गावातीलच कृषी पदवीधर असलेल्या एल. डी. चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.

१५ गुंठ्यात चार क्विंटलचा अंदाज

सर्वसामान्य सूर्यफुलाच्या झाडांची उंची ४ ते ५ फूट असते; पण पाटील यांच्या शेतातील सूर्यफुलाच्या झाडाची उंची ८ ते ९ फूट आहे. सूर्यफुलाचा व्यासही सव्वा ते दीड फुटाच्या आसपास आहे. फुलांची वाढ होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या नाहीत. १५ गुंठ्यांमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या सूर्यफुलाचे तीन ते चार क्विंटल उत्पादन निघेल आणि त्यातून २० हजार रुपयांचे उत्पादन मिळेल, अशी आनंदा पाटील यांना आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT