Farm Pond  Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Subsidy : बॅंक खाते आधार संलग्न नसल्याने शेततळ्यांचे अनुदान रोखले

Farm Pond Scheme : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई केलेल्या अंदाजे पाच हजार शेततळ्यांना ३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान आतापर्यंत वाटण्यात आले आहे.

मनोज कापडे

Pune News : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई केलेल्या अंदाजे पाच हजार शेततळ्यांना ३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान आतापर्यंत वाटण्यात आले आहे. मात्र बॅंक खाते आधार संलग्न नसल्यास अनुदान न देण्याची ठाम भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

शेततळ्यासाठी अनुदान मिळवण्याकरिता शेतकऱ्याकडून ऑफलाइन अर्ज मागवण्याची क्लिष्ट पद्धत कृषी विभागाने यापूर्वीच बंद केली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज मागवून सोडत काढणे व केवळ सोडतीत पात्र ठरलेले अर्ज विचारात घेण्याचे आधीचे धोरणही रद्द करण्यात आले आहे.

‘महाडीबीटी’च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज करताच अनुदानाचा लाभ, या नव्या धोरणानुसार आता ऑनलाइन अर्ज मागवून तत्काळ मंजुरी दिली जात आहे. मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले यांच्याकडून शेततळे बांधणी योजनेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेततळे अनुदान योजनेच्या प्रक्रियेत यंदा राज्यभरातील ७६७१९ शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेण्यात आले आहेत. अनुदानासाठी निवड केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २८१४१ शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत.

त्यातील १७२१९ शेतकऱ्यांना तळे खोदाईसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. तळे खोदाई पूर्ण झाल्यामुळे अनुदान मिळावे यासाठी राज्यभरातून ५२८५ गावांमधून अनुदान मागणी प्रस्ताव कृषी विभागाला आले आहेत. अर्थात, जागेवर तळ्याची तपासणी केल्यानंतरच अनुदान देण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

‘‘अनुदान मागणी करणाऱ्या प्रस्तावांपैकी ५२८५ प्रस्तावांना अनुदान देण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. मात्र त्यासाठी तळ्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष तपासणी केली जाते. तपासणीअंती ४९७० तळ्यांना अनुदान देण्यात आले आहे. परंतु आधार संलग्नता नसलेल्या ७० प्रकरणांना तूर्त अनुदान मिळणार नाही. सर्व अटींची पूर्तता केलेल्या २४५ शेततळ्यांना आम्ही याच महिन्यात अनुदान वाटणार आहोत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षित सिंचनाकरिता शेततळेच उपयुक्त ठरते. त्यासाठी प्रतितळे कमाल ७५ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. अर्ज करताच निवड केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करीत या योजनेत सहभागी व्हावे.
- रवींद्र भोसले, कृषी संचालक, मृद्‍संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT