Farm Pond : विद्यापीठाच्या शेततळ्यांमुळे निर्माण झाला १०० कोटी लिटर पाणीसाठा

Panjabrao Deshmukh Agri university : गेल्या काही वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर तब्बल ३६ तलाव (अमृत सरोवर) झाले असून, यामुळे सिंचनाची सुविधा निर्माण होण्यास मोठी मदत झाली.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेल्या काही वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर तब्बल ३६ तलाव (अमृत सरोवर) झाले असून, यामुळे सिंचनाची सुविधा निर्माण होण्यास मोठी मदत झाली. येत्या दोन वर्षांत विद्यापीठाचे बहुतांश शेतशिवार हे ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. सिंचनासाठी सुविधा तयार करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. हा निधी मिळाला तर वेगळे चित्र उभे राहू शकते.

Farm Pond
Agriculture Irrigation Scheme : ‘कृषी सिंचन योजने’अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे

विदर्भ हा कोरडवाहू शेतीचा मोठा पट्टा आहे. एकूण शेतीक्षेत्रापैकी ८४ टक्के क्षेत्र मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठही याच परिस्थितीतून जात होते. विद्यापीठाला बीजोत्पादन आणि संशोधन कार्यक्रमांसाठी सातत्याने पाणीटंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागला. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी २०१७ मध्ये विनामूल्य शेततळे खोदून त्यातून गौण खनिज उत्खनन करण्याची अभिनव योजना आखली. दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या उद्देशाने महामार्ग बांधकामाला दुय्यम खनिजे मोठ्या प्रमाणात मिळवण्यासाठी मोफत शेततळे खोदून देण्याची ही योजना होती. कृषी विद्यापीठाने या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विद्यापीठाच्या दोन प्रमुख शेतात म्हणजे केंद्रीय प्रात्यक्षिक फार्म आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ आणि जुन्या राष्ट्रीय महामार्ग सहा शेजारील केंद्रीय संशोधन केंद्रावर ३० शेततळे यशस्वीरीत्या खोदले. यामुळे जलसंधारणापोटी शासनाची जवळपास ३० कोटी रुपयांची बचत झाली. याद्वारे १२७६ टीसीएम पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. वर्षभरात सुमारे साडेसहाशे हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाची क्षमता बनली. हे शेततळे पहिल्याच वर्षी तुडुंब भरले होते. यामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांना फायदा झाला. तलावांमध्ये तयार झालेल्या साठ्याचा येत्या दोन वर्षांत १०० टक्के वापर करण्याचे नियोजन केल्याचेही कुलगुरूंनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com