Agriculture Barren Agrowon
ॲग्रो विशेष

Saline land Protection : खारभूमी संरक्षणात अपयश

Agriculture Barren : सतत येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील तीन हजार १६ हेक्टर शेती कायमची नापीक झाली आहे.

Team Agrowon

Alibaug News : सतत येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील तीन हजार १६ हेक्टर शेती कायमची नापीक झाली आहे. खारभूमी विभागाकडून आतापर्यंत १५६ पैकी १३५ योजना पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, बांधलेला बांधबंदिस्‍ती काही वर्षांतच नादुरुस्त होत असल्याने परिस्‍थिती ‘जैथे थे’ होते. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले

तरी खारभूमीचे संरक्षणात अपयशयेत असल्‍याचा आरोप अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात नापीक क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे सरकारने आतातरी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.

हाशिवरे मानकुळे योजनेतही भ्रष्टाचार झाला असून ११ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला होता. यात वेळेत व आराखड्याप्रमाणे कामे झाली नसतानाही वाढीव २२ कोटींचा निधी उपलब्‍ध करून घेण्यात आला, प्रत्‍यक्षात ठेकेदाराला मात्र केवळ साडे सहा कोटींची बिले अदा करण्यात आली. त्‍यामुळे उर्वरित निधी कुठे गेला, असा प्रश्‍न पाटील यांनी उपस्‍थित केला आहे.

रायगड जिल्ह्यात उरण, पेण, मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यात खारभूमीच्या एकूण १५६ योजना आहेत. यातून २२ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र समुद्राच्या पाण्यापासून संरक्षित होणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा, मानकुळे, धेरंड-शहापूर आदी गावे समुद्र गिळंकृत करीत आहे. गणेशपट्टी हे गाव यापूर्वीच समुद्राने गिळंकृत केल्याने खारभूमी क्षेत्रासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे.

कोकणातील समुद्र किनारी आणि खाडी किनारी असणाऱ्या शेतजमिनींना खारभूमी असे संबोधले जाते. उधाणापासून शेतजमिनींचे संरक्षण व्हावे, यासाठी बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याला खारबंदिस्ती म्हणतात. पूर्वी या बंदिस्तीच्या देखभाल दुरुस्तीची कामे लोकसहभागातून केली जायची, मात्र आता बंदिस्तीच्या देखभाल दुरुस्तीची कामे खारभूमी विभागाकडून केली जातात. धेरंड, धाकटापाडा, शहापूर, सातिर्डे, शहाबाजमधील बांधबंदिस्ती नादुरुस्त झाल्या आहेत.

अधिकारी मूग गिळून

खारभूमीचे अधिकारी प्रशांत बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. इतर अधिकारीही या प्रकाराबद्दल माहिती देत नाहीत. तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्‍याने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्‍न किनारपट्टीलगतच्या शेतकऱ्यांना पडला.

४६ पैकी १४ योजनांसाठी निधी मंजूर

रायगड जिल्ह्यातील ४६ योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खारभूमी विभागाने २१८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. यातील १४ योजनांसाठी ७८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अशा प्रकारे डागडुजीसाठी दरवर्षी निधी येत असतो, परंतु त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

सर्वाधिक फटका अलिबागला

जिल्ह्यात एकूण २२ हजार ७४९ हेक्टर खारभूमी क्षेत्र आहे. यात अलिबाग तालुक्यातील सात हजार ६१३ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.

तीन हजार १६ हेक्टर जमीन उधाणामुळे कायमची नापीक झाली आहे. अलिबागमधील ३६ योजनांपैकी ३० योजनाच सध्या कार्यरत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT