Delhi Farmers Protest : केंद्र सरकारने दिला ‘एमएसपी’चा नवा प्रस्ताव

MSP Act : शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यातील चर्चेची चौथी फेरी रविवारी (ता. १८) रात्री उशिरा संपली. चर्चेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस ‘दिल्ली चलो’ आंदोलन थांबवणार असल्याचे सांगितले.
Delhi Farmers Protest
Delhi Farmers ProtestAgrowon

Delhi Farmers Protest Update : शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यातील चर्चेची चौथी फेरी रविवारी (ता. १८) रात्री उशिरा संपली. चर्चेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस ‘दिल्ली चलो’ आंदोलन थांबवणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांत सरकारने सादर केलेला किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) नवा प्रस्ताव शेतकरी समजून घेतील आणि त्यानंतर भविष्यासाठी नवीन धोरण ठरवतील.

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पियूष गोयल आणि नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते. मंत्री पियूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारतीय किसान मजदूर संघ आणि इतर शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाली.

Delhi Farmers Protest
Delhi Farmer Protest : चर्चा सकारात्मक; तोडगा नाहीच

पियुष गोयल म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या नवीन कल्पनांवर चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी काही सकारात्मक सूचना केल्या आहेत. याचा फायदा पंजाब, हरियाना तसेच देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होणार आहे.

या बैठकीत केंद्र सरकारने एमएसपी हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या तीन मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: एमएसपीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने तयार केलेल्या फ्रेमवर्कवर शेतकऱ्यांची सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी येत्या दोन दिवसांत सरकारच्या प्रस्तावाचा अभ्यास करतील. या काळात ते दिल्लीला जाणार नाहीत.

Delhi Farmers Protest
Delhi Farmers Protest : ‘एमएसपी’साठी कायदेशीर हमी देण्यासाठी अध्यादेशाची मागणी

ते म्हणाले, की दिल्लीला परतल्यानंतर एनसीसीएफ आणि ‘नाफेड’शीही चर्चा करू. आम्ही एकत्रितपणे एक अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना मांडली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (एससीसीएफ) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) यांना एमएसपीवर डाळ खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांशी पाच वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) एमएसपीवर कापसाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांशी पाच वर्षांचा करार करेल.

दिल्लीला जाण्याचा निर्णय दोन दिवस थांबवला

शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर म्हणाले, की आम्ही १९ आणि २० फेब्रुवारीला आमच्या मंचावर चर्चा करू आणि तज्ज्ञांची मते घेऊ. या आधारेच पुढील निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आणि इतर मागण्यांबाबत चर्चा अद्याप प्रलंबित असून येत्या दोन दिवसांत त्यावरही तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीला जण्याचा निर्णय सध्या थांबवण्यात आला आहे, मात्र सर्व प्रश्न मार्गी न लागल्यास बुधवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com