Krishna River Agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Control Board : कृष्णा नदीत मासे मृत्यूप्रकरणी कारखान्यांना साडेचार कोटी रुपये दंड

Krishna River Fish Death News : सांगली महापालिकादेखील यास जबाबदार असून, त्यांच्यावरील दंड निश्‍चितीचे आकडे मोठे असून ते अंतिम करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे.

Team Agrowon

Sangli News : कृष्णा नदीत गेल्यावर्षी जून, जुलैमध्ये झालेल्या माशांच्या मृत्यूप्रकरणी तीन साखर कारखाने आणि त्यांच्या मद्यार्क प्रकल्पांना एकूण ४ कोटी ४६ लाख ४० हजार रुपये दंड आकारावा, असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरीत लवादाकडे सादर केला आहे.

सांगली महापालिकादेखील यास जबाबदार असून, त्यांच्यावरील दंड निश्‍चितीचे आकडे मोठे असून ते अंतिम करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे. या प्रकरणी हरित लवादात याचिका दाखल केलेले स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे आणि ॲड. ओंकार वांगीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, की कृष्णा नदीत बहेपासून ते सांगली बंधाऱ्यापर्यंत आणि पुढे हरिपूर संगमापर्यंत हजारो मासे मृत झाले होते. दोन महिन्यांत दोन वेळा अशी घटना घडली होती. त्याच्या मुळाशी जावे आणि त्याला जबाबदार घटकांना दंड करावा, यासाठी आम्ही याचिका दाखल केली.

त्यानंतर समिती निश्‍चित करण्यात आली आणि त्याच्या पाहणीचा अहवाल सादर झाला. त्या समितीत जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी सहभागी होते. हरीत लवादाने या प्रकरणातील दोषींवर दंड निश्‍चितीचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी (ता. २९) त्याचा अहवाल सादर करण्यात आला.

कारखाना आणि दंड (रुपयांत)

 हुतात्मा कारखाना डिस्टिलरी युनिट ५६ लाख ७० हजार

 हुतात्मा कारखाना साखर युनिट ४२ लाख ३० हजार

 राजारामबापू कारखाना साखर युनिट ४० लाख ५० हजार

 राजारामबापू कारखाना डिस्टिलरी युनिट ७४ लाख १० हजार

 कृष्णा कारखाना डिस्टिलरी युनिट १ कोटी १६ लाख

 कृष्णा कारखाना साखर युनिट १ कोटी १६ लाख

 महापालिका दंड निश्‍चितीसाठी मुदतवाढीची मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Farming: वाशीममध्ये रब्बी लागवड ८२ टक्क्यांवर

Farmer Empowerment: तंत्रज्ञानातून आपला शेतकरी मजबूत होणार

Book Review: कृषी क्षेत्रातील नॅनोतंत्रज्ञानाची ओळख

Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले

Alaknanda Galaxy: ‘अलकनंदा’च्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT