Fish Specie : प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्य प्रजाती नामशेष?

Fish Species In Crisis Due To Pollution : वाढते प्रदूषण, नियमबाह्य मासेमारीमुळे त्‍यात कमालीची घट झाली असून खाड्यांमधील ४८ मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाऱ्या पाण्यातील मासेमारीवर संकट ओढावले असून मासेमारीवर अवलंबून मच्छीमारांच्या उपजीविकेवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
Salt Water
Salt WaterAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : एकेकाळी मासेमारी हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय होता, मात्र वाढते प्रदूषण, नियमबाह्य मासेमारीमुळे त्‍यात कमालीची घट झाली असून खाड्यांमधील ४८ मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाऱ्या पाण्यातील मासेमारीवर संकट ओढावले असून मासेमारीवर अवलंबून मच्छीमारांच्या उपजीविकेवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

अलिबाग, पेण तालुक्यांत पूर्वी जिताडा मासा विपूल प्रमाणात मिळायचा. भातकापणी करताना शेतातल्या पाण्यात हा मासा नक्की सापडायचा, मात्र वाढत्या प्रदूषणामुळे हा मासा दिसेनासा झाला आहे. त्याचबरोबर खाऱ्या पाण्यात सापडणारी चिंबोरी, कालवे, मुठे या मासळीचाही त्‍यात समावेश आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रायगड जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ५३ हजार ३३८ टन खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्हायचे, ते आता ४० हजार ६०१ टनावर आले आहे. यात राजपुरी, रेवदंडा, धरमतर, करंजा खाडीतील मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली आहे.

Salt Water
Food Industry : अन्न उद्योग क्षेत्रात नऊ वर्षांत ५० हजार कोटींची परकीय गुंतवणूक

लहान मच्छीमारांसाठी खाड्यांमधील मासेमारी उपयुक्त होती. मात्र, राजपुरी खाडीतील दिघी-आगरदंडा बंदर, रेवदंडा खाडीतील कोळशाची वाहतूक, धरमतर खाडीतील गंधक, कोळसा यासारख्या खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या खाड्यांमध्ये रायगडमधील सर्व रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे एकेकाळी मत्स्य उत्पादनात संपन्न असलेल्या या भागात मत्स्य दुष्काळ जाणवू लागला आहे. खाड्यांमध्ये १९९० च्या दरम्यान जितकी मासेमारी होत असे त्यामध्ये ३० ते ४० टक्के घट झाल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

Salt Water
Sitaphal Orchard Success Story : निर्यातक्षम सीताफळ बागेची जोपासना
दरवर्षी किती टन मासेमारी होते, कोणत्या माशांचे प्रमाण किती, याची माहिती मत्स्यव्यवसाय विभाग मच्छीमार सोसायट्यांकडून घेत असतो. त्याचबरोबर सीएमएफआरआय यासारख्या मस्त्य जीवांवर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. त्यांच्याकडून मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामांची माहिती सरकारला पाठवली जाते. कोकण किनारपट्टीवर मत्स्य उत्पादन कमी होण्यास अनेक कारणे आहेत.
संजय पाटील, सह उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग रायगड

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम

खाडीत आढळणारे छोट्या स्वरूपाचे असून प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या कांदळवनात सापडतात. मात्र, खाडी किनाऱ्यावरील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मत्स्य प्रजातींवर होत आहे. एका अभ्यासानुसार, मुंबई सागरी क्षेत्रातील जवळपास ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रायगडमधील रासायनिक कारखानदारी आणि बंदरांमध्ये होणाऱ्या जलवाहतुकीचा यावर विपरीत परिणाम झाल्याचे संशोधकांचे मत आहे.

नैसर्गिक प्रजननस्थळे धोक्यात

खाड्यांमध्ये सापडणाऱ्या माशांचे कांदळवने नैसर्गिक निवासस्थाने आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात असलेली कांदळवने प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. या ठिकाणी वाहून आलेला कचरा, चिखलावर तरंगणारे तेलतवंग, कारखान्यांमधून सोडलेले रासायनिक सांडपाणी यामुळे माशांची अंडी घालण्याची ठिकाणेच संकटात आली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून खाडीत आढळून येणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती संकटात आल्या आहेत.

मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

ज्या मच्छीमारांना खोल समुद्रात इंधन खर्च करून जाणे शक्य नसते ते खाडीभागात मासेमारी करून कुटुंबाची उपजीविका करतात. धरमतर खाडीतील स्थानिक शेतकऱ्यांचा हा प्रमुख व्यवसाय होता. भरतीदरम्यान किनाऱ्यावर टाकलेल्या जाळ्यांमध्ये बऱ्यापैकी मासे मिळत असत. राजपुरी, करंजा, बाणकोटच्या खाडीत अशा प्रकारची मासेमारी मोठ्या प्रमाणात चालत असे. अलिकडे अशा प्रकारच्या मासेमारीचे चित्र क्वचितच दिसते.

संकटात असलेल्या प्रजाती..

खाडीभागात सापडणाऱ्या माशांमध्ये शिरसई, चिंबोरी, मुठे, तेल्या निवटा, खवली, काचणी, सुड्डा, हेसाळ, चिलोकटी, टोळके, मांदेली, कोत्या, टोळ, हरणटोळ, मांगीन, पिळसा, वरा, तेंडली, भिलजे, चांदवा, घोया, चिवनी, गोदीर, कर्ली, येकरू, सर माकली, हैद, मुड्डा, ताम,खरबी, केड्डी, जिताडा, करपाली, सफेद पातळी कोळंबी, पोचे, कोलीम (जवळा), खरपी चिंबोरा, खुबे, शिवल्या, कालवे, पालक आणि ढोमे या माशांच्या प्रजातींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com