Banana Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना मुदतवाढ, कृषी मंत्र्यांची माहिती

PM Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती.

sandeep Shirguppe

Maharashtra Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती.

३१ ऑक्टोबर पर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता.

तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

मंत्री धनंजय मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT