Agricultural Development Officer Manoj Kumar Vetal Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Export : गटशेतीच्या माध्यमातून हळदीची निर्यात शक्य

Agricultural Development Officer Manoj Kumar Vetal : गटशेतीच्या माध्यमातून रासायनिक अंशमुक्त हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यातून हळदीची अधिकाधिक निर्यात शक्य आहे, असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sangli News : हळदीला निर्यातीची मोठी संधी असून त्यासाठी रासायनिक अंश मुक्त हळद उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कल वाढवला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीच्या माध्यमातून रासायनिक अंशमुक्त हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यातून हळदीची अधिकाधिक निर्यात शक्य आहे, असे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केले.

आष्टा (ता. वाळवा) येथील स्व. शंकरराव शिंदे उत्तरभाग सेवा सहकारी सोसायटी येथे शनिवारी (ता. २५) ॲग्रोवन व रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हळद पीक व्यवस्थापन या विषयावर ‘ॲग्रो संवाद’चे चर्चासत्र झाले. त्या वेळी श्री. वेताळ बोलत होते. या वेळी रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि.चे विभागीय व्यवस्थापक सागर पिसे, वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव, वैभव चौगुले, शिवराज माने, वितरक ऋतुकेश चौगुले, संजीव कोल्हार, मनोज पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मनोजकुमार वेताळ म्हणाले, की देशातून हळदीची सर्वाधिक निर्यात होत असली तरीही आजही परदेशातील हळद खरेदी कंपन्यांकडून रासायनिक अंशमुक्त हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार आणि रासायनिक अंशमुक्त हळदीकडे वळण्याची गरज आहे. त्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

हळदीमध्ये प्रामुख्याने कंद कीड आणि कंद कुज याचा प्रादुर्भाव होत आहे. त्यासाठी जमीन निचरा होणारी हवी. तसेच बियाणे निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धतीसाठी नव्या तंत्राचा वापर केला पाहिजे. उगवण, वाढीची अवस्था, हळकुंड लागणे आणि हळकुंड भरणे या हळद पिकाच्या चार अवस्था आहेत. या चार अवस्थेत भरणी, खत, पाणी व्यवस्थापन नेटके केले तर हळदीचे अपेक्षित उत्पादन मिळणे शक्य आहे.

रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव म्हणाले, की आमच्या कंपनीने जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये काम केले आहे. इस्राईलस्थित असणाऱ्या कंपनीने उपग्रहाद्वारे पीकपाणी नियोजन विकसित केले आहे. मान्ना एरिगेशन अॅपद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी योग्य ते मार्गदर्शन या अॅपद्वारे केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिवुलिसचा ड्रीपरचा दर्जा चांगला असल्याने पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा सर्वदूर एकसमान विसर्गाची खात्री रिवुलिसद्वारे दिली जाते.

‘अॅग्रोवन’चे सहायक व्यवस्थापक वितरण महेश बेले यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’चे संदीप पाटील यांनी आभार मानले. ‘अॅग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी अभिजित डाके आणि वितरणचे दत्ता कोळी यांनी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT