Turmeric Export : हळदीची १७ हजार टनांनी निर्यात वाढली

Turmeric Production : देशातून वर्षभरात १.७० लाख टन निर्यात
Turmeric Export
Turmeric ExportAgrowon
Published on
Updated on

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Turmeric : सांगली ः शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत हळदीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. जागतिक बाजारपेठेत देशातील हळदीला चांगली मागणी असल्याने निर्यातही वाढत आहे.

२०२२-२३ या वर्षात देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली असून, २१-२२ च्या तुलनेत १७ हजार ३२७ टनाने निर्यात वाढली आहे. त्यामुळे हळद निर्यातीत देश अव्वलस्थानी कायम असल्याची माहिती हळद निर्यात उद्योगातील जाणकारांनी दिली.

जागतिक पातळीवर भारत हळद उत्पादनात अग्रेसर आहे. जागतिक बाजारपेठेत हळद निर्यात करणारे देशभरात सुमारे ८ हजारांहून अधिक निर्यातदार आहेत. भारतातून सौदी अरेबिया, युरोप, युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, जपान यासह अनेक देशांत हळदीची निर्यात होते. युरोप, युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका या देशात हळदीचा चांगले दर मिळतात. त्यामुळे या देशात हळदीची निर्यात अधिक होते.
भारतातून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हळदीची निर्यात वाढत आहे.

एकूण उत्पादनाच्या सरासरी १० ते १२ टक्के निर्यात होते. २०२०-२१ मध्ये देशातून १ लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात झाली होती. मात्र गतवर्षी बदलत्या वातावरणाचा फटका उत्पादनावर बसल्याने उत्पादनही कमी झाले होते. त्यातच जागतिक बाजारपेठेत दरात घसरण झाली होती. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला. त्यामुळे २०२१-२२ मध्ये देशातून हळदीची निर्यात ३१ हजार ११० टनांनी घटली होती.

Turmeric Export
Price Of Turmeric : हळदीला विक्रमी दर, वसमत बाजार समितीत हळदीची आवक वाढली

दरम्यान, २०२२-२३ मध्ये हळदीला पोषक वातावरण असल्याने हळदीचे अपेक्षित उत्पादन मिळाले. तसेच जागतिक बाजारपेठेत हळदीचे दर टिकून राहिले. त्यामुळे जगभरातील बाजारपेठेतून हळदीची मागणी वाढल्याने निर्यातही वाढण्यास मदत झाली.

यामुळे देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली. गतवर्षीच्या तुलनेत १७ हजार ३२७ टनाने हळद निर्यात वाढली आहे.

निर्यातीचे चित्र
गेल्या चार वर्षांपूर्वी एकूण हळदीच्या उत्पादनापैकी सरासरी दोन टक्क्यांनी निर्यातीत वाढ झाली. अर्थात, हळद निर्यातीचा आलेख १० ते १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

मात्र कोरोनाच्या काळात निर्यातीस अडथळे आले असल्याने निर्यातीच्या टक्केवारीत घट झाली होती. हळदीचा दर्जा चांगला असल्याने निर्यातीला अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे निर्यात वाढत आहे.

गेल्या चार वर्षांतील हळद निर्यात
वर्ष.... निर्यात (टनात)...उलाढाल (कोटींत)

२०१९-२०...१,३७,६५०...१२८६
२०२०-२१...१,८३,८६८...१७२२
२०२१-२२...१,५२,७५८...१५३४
२०२२-२३...१,७०,०८५...१६६६


हळदीच्या एकूण उत्पादनाच्या सरासरी १० ते १२ टक्के हळदीची निर्यात होते. गतवर्षी हळदीचे उत्पादन कमी झाल्याने निर्यात कमी झाली होती. २०२२-२३ या वर्षात हळदीची निर्यात पुन्हा वाढली आहे. हळद निर्यात वाढीसाठी हळद संशोधन केंद्र आणि स्पाइसेस बोर्ड असा एकत्र पुढाकार घेणार आहे.
- डॉ. मनोज माळी,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com